ग्रामपंचायत सदस्यासह महिलेला मारहाण
By Admin | Updated: May 10, 2014 00:15 IST2014-05-10T00:15:25+5:302014-05-10T00:15:25+5:30
क्षुल्लकशा वादातून ग्रामपंचायत सदस्यासह एका महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना देव्हाडा खुर्द येथे काल गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

ग्रामपंचायत सदस्यासह महिलेला मारहाण
करडी (पालोरा) : क्षुल्लकशा वादातून ग्रामपंचायत सदस्यासह एका महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना देव्हाडा खुर्द येथे काल गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. किशोर रंगारी व संगीता मनोज मुलतानी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
देव्हाडा येथील कोहिनूर रमेश डोंगरे, समीर रमेश डोंगरे या दोन्ही भावंडाचे त्यांच्या शेजारी राहणार्या संगिता मनोज मुलतानी यांच्यासोबत जुना वाद आहे. या वादातून रात्रीच्या सुमारास भांडण सुरू झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर रंगारी उपस्थित होते. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संगीता मुलतानी व किशोर रंगारी यांना दोन्ही डोंगरे भावडांनी लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालावरून कोहिनूर व समीर डोंगरे यांच्या विरोधात मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल अटक केली आहे. (वार्ताहर)