सातपैकी एक आरोपी होणार माफीचा साक्षीदार
By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T23:35:38+5:302014-08-31T23:35:38+5:30
सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा), त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र तयार करताना सबळ पुरावे कसे गोळा करावे याबाबत विशेष सरकारी

सातपैकी एक आरोपी होणार माफीचा साक्षीदार
तुमसर : सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा), त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र तयार करताना सबळ पुरावे कसे गोळा करावे याबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मार्गदर्शन तुमसर पोलिसांना केल्याची माहिती आहे. तिहेरी हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने सात आरोपीपैकी एकाला सरकारी माफीचा साक्षीदार बनविण्यात येणार आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
दि. २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री प्रख्यात सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा दु्रमील या तिघांची सात दरोडेखोरांनी गळा आवळून हत्या केली होती. संजय यांची हत्या तिरोडाजवळील विहीरगाव शिवारात गळा आवळून खून केला तर पत्नी पुनम व मुलगा द्रमिल यांची हत्या राहत्या घरी गुरुनानक नगरात केली होती. आरोपींना कठोर शिक्षेकरिता सबळ पुरावे गोळा करण्याकरिता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मार्गदर्शन केले. आरोपपत्र तयार करतानाही निकम यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती सुत्राने दिली. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तुमसर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
२ कोटी ९ लाख किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला. दरोडा व तिहेरी हत्याकांड घडले असताना प्रत्यक्षदर्शी पुरावा येथे नाही. त्यामुळे आरोपींचा बचाव येथे होण्याची शक्या नाकारता येत नाही.
या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरिता सात आरोपींपैकी एकाला सरकारी माफीचा साक्षीदार प्रत्यक्षदर्शी सबळ पुरावा तयार करण्यात आल्याची माहिती सुत्राने दिली. सातपैकी या हत्याकांडात माफीचा साक्षीदार कोण होतो याकडे लक्ष लागले आहे. या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग नसणे, कटात प्रत्यक्ष सहभाग नसणे, खून होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणे, याशिवाय त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद कमी असणे या बिंदूवर विचार करण्यात येतो. पोलीस चौकशीत चांगले सहकार्य व प्रामाणिक जबाब देणारा तथा संपूर्ण हकीकत सांगणारा आरोपी हाच सरकारी माफीचा साक्षीदार होतो अशी माहिती आहे. १ सप्टेंबर रोजी सरकारी वकील भंडारा न्यायालयात प्रश्नांची सुरुवात करून करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)