आला थंडीचा महिना, हिवाळ्यात आरोग्य सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:33+5:30

दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय हिरवा भाजीपालाही मोठ्या प्रमाणात निघत असल्याने दिवसात खाण्यापिण्याची मजाच असते. असे असतानाच मात्र दमा, संधीवात व सिकलसेल रुग्णांसाठी हा हिवाळा त्रासदायी ठरतो.

Winter is here, take care of your health in winter! | आला थंडीचा महिना, हिवाळ्यात आरोग्य सांभाळा!

आला थंडीचा महिना, हिवाळ्यात आरोग्य सांभाळा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  गत आठ महिन्यांपासून वातावरणातील बदलांमुळे आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. आता तेथेच थंडीचे दिवस आरोग्यासाठी अत्यंत उत्तम राहत असून पौष्टिक खानपान व वातावरणात आरोग्यही चांगले असते. यामुळे सर्वांनाच हिवाळा हवाहवासा वाटतो. 
दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय हिरवा भाजीपालाही मोठ्या प्रमाणात निघत असल्याने दिवसात खाण्यापिण्याची मजाच असते. असे असतानाच मात्र दमा, संधीवात व सिकलसेल रुग्णांसाठी हा हिवाळा त्रासदायी ठरतो. अशात या व्यक्तींनी जरा जपूनच वावरणे गरजेचे असते. यासाठी गरम कपड्यांचा वापर व स्वच्छ वातावरणात वावर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हिवाळ्याच्या दिवसात आबालवृद्धांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात आहार कोणता घ्यावा? 
- हिवाळ्यात खाण्यापिण्याची खरी मजा असते. कारण हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या निघतात. हिरव्या भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी महत्त्वाचे असून यामुळे आपले आरोग्य निरोगी असते. तसेच मोसमी फळांचे सेवन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला मजबूत बनविते. 
- तसेच या दिवसांत भरपूर पाणी प्यायला हवे तसेच रसदार पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. हिवाळ्यात निघणाऱ्या सर्वच मोसमी पदार्थांची मजा घ्यावी. 

काळजी कोणी घ्यावी? 
- थंडीच्या दिवसात सर्वाधिक काळजी घेण्याची गरज असते ती दमा रुग्णांना. थंडीच्या दिवसांत धुळीचे प्रमाण वाढते तसेच वनस्पतींना फुलं येतात. अशात त्यांना लवकरच त्रास होतो. 
- सिकलसेल रुग्णांसाठीही हा काळ त्रासदायक असतो. कारण थंडीत रक्तवाहिन्या आखडतात व त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. 
- संधीवात असलेल्या रुग्णांना अंगदुखीचा त्रास होतो. 
- अशात दमा रुग्ण व ज्यांना ॲलर्जी आहे अशा व्यक्तींनी शेतीची कामे टाळावी. मास्कचा नियमित वापर करावा तसेच धूळ व घरातील फोडणी आदींपासून बचाव करावा. 
- अशात रस भरलेले पदार्थ, मोसमी फळ व भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. दमा असलेल्या रुग्णांनी मास्कचा नियमित वापर करावा. 

 

Web Title: Winter is here, take care of your health in winter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.