पवनी तालुक्यात वादळी पाऊस
By Admin | Updated: April 11, 2015 00:34 IST2015-04-11T00:34:27+5:302015-04-11T00:34:27+5:30
पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पवनी तालुक्यात वादळी पाऊस
शेतकरी संकटात : भाजीपाला पिकांसह रबीचेही पीक मातीमोल
आसगाव (चौरास) : पवनी तालुक्यात सतत दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वादळी पावसाचा फटका टिनाच्या शेडला व आंब्याच्या पिकाला बसलेला आहे. बऱ्याच प्रमाणात उभे केलेले टिनाचे शेड, शाळेतील किचन शेड, गरीबाच्या झोपड्या उडाल्या आहेत तर आंब्याला लागलेली आंबे मोठ्या प्रमाणावर गळून पडले आहेत. काही प्रमाणात शेतातील पिक गहू, चना, भाजीपाला पिके, केळीचे बगीचे, फूल बागेचे नेट हाऊस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे.
विद्युत विभागाची सुद्धा हानी झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब, लाईनच्या डिप्या बंद पडल्या असून, खांबखाली लोळून पडलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर एका मागे संकटे येत असून शासन मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.
चौरास उन्हाळी भात शेती असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी रस्ते नाहीत. कच्च्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिकाचे पुजणे शेतात पडून आहेत. या वादळी पावसामुळे रब्बी पिकाचे ढगाला अंकुल आले आहेत.
शेतात माल विकूनही शेतकरी चुरणे करू शकत नाहीत. गुराचा चारा घरी आणू शकत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा या छोट्याशा बाबीमुळे अनेक शेतकऱ्याचा माल रस्त्याअभावी उभा सडत असतो. त्यामुळे चौरास भागात शेतकऱ्यासाठी अंतर्गत रस्ते सुद्धा होणे आता महत्वाचे झाले आहे. (वार्ताहर)