पवनीत भूस्खलनाचा धोका

By Admin | Updated: August 4, 2014 23:33 IST2014-08-04T23:33:40+5:302014-08-04T23:33:40+5:30

येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळील नदीकाठावर वसलेल्या घरांवर भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Wind danger risk | पवनीत भूस्खलनाचा धोका

पवनीत भूस्खलनाचा धोका

उपाययोजना नाही : नदी काठावरची माती खचणे सुरू
पवनी : येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळील नदीकाठावर वसलेल्या घरांवर भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुलाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर जवळपास १५० घरे वसलेली आहे. प्रत्येकवर्षी नदीला पूर येवून किनारा ढासळत आहे. त्यामुळे नदीकाठावरील घरांवर भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
यावर्षी पावसाळ्यापूवीर भुस्खलनापासून होणाऱ्या संभावित धोक्यापासून बचावाकरीता तालुका प्रशासनाने नदीच्या खाली एक छोटीशी संरक्षण भिंत बांधण्यात आली, परंतु या भिंतीची उंची ३० फुट आहे. काठावरील घराची उंची ५० ते ६० फुट आहे. नदीचा काठ कडेलोट होऊ नये, याकरीता येथे मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली. पण पावसाळ्यात ही माती नदीत खचत असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. जर नदीला मोठा पूर आला तर येथे भुस्खलन होवून काठावरील घरे जमीनीत दबण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wind danger risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.