पेरणीची वेळ गेल्यावर पाणी सोडाल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:39+5:302021-07-15T04:24:39+5:30

नेरला उपसा सिंचन सुरू होऊन पाच वर्षे झालीत. त्यात २०१८-१९,२०१९-२० ची वसुली करणे सुरू आहे. पण २०२०-२१ चे रेट ...

Will water be released after sowing time? | पेरणीची वेळ गेल्यावर पाणी सोडाल काय ?

पेरणीची वेळ गेल्यावर पाणी सोडाल काय ?

नेरला उपसा सिंचन सुरू होऊन पाच वर्षे झालीत. त्यात २०१८-१९,२०१९-२० ची वसुली करणे सुरू आहे. पण २०२०-२१ चे रेट अद्याप आले नसल्याने, म्हणजे शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षांचा पाणीपट्टी कर भरायचा आहे.

संबंधित विभाग आज ज्या धडाडीने वसुलीच्या कामाला लागले आहेत, हाच प्रयत्न जर त्याचवेळी केला गेला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही बोलले जात आहे. पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी कर वसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात, मग हीच कामे आधीच केली असती, तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, असेही आज बोलले जात आहे.

Web Title: Will water be released after sowing time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.