भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या समस्या सोडविणार
By Admin | Updated: April 10, 2015 00:43 IST2015-04-10T00:43:52+5:302015-04-10T00:43:52+5:30
भंडारा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यासंदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत व रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या समस्या सोडविणार
वरठी : भंडारा रोड रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यासंदर्भात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत व रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यासमोर समस्याचा पाढा वाचला. यावेळी अनेक संघटनानी निवेदन दिले. त्यावर खा.पटोले यांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा, प्रवाशी गाड्याचा थांबा, सुरक्षा व्यवस्था, रेल्वे स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण यासह गावकऱ्याकरीता एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी आवश्यक असलेले फूटब्रिज आदी समस्या मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी रेल्वेचे नागपूर विभागाचे डी.आर.एम. आलोक कन्सल, मंडळ रेल्वे आरपीएफ आयुक्त डी.बी. गौर, वरिष्ठ डी.सी.एम. तन्मय मुखोपाध्याय, मंडळ अभियंता के.सी. शाहु, गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप झलके, मोहाडी पंचायत समिती सभापती विना झंझाड, जिल्हा परिषद सदस्य डॉ.उल्हास बुराडे, नगरसेवक सुर्यकांत इलमे, मंगेश वंजारी, रेल्वे कमेटीचे सदस्य विजय खंडेरा, सेवक कारेमोरे, तहसीलदार कल्याण डहाट, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव रघुते, चेतन डांगरे, विरेंद्र देशमुख, घनश्याम बोंदरे, सुरजभान चव्हाण, सुनिता बोंदरे, पुष्पा भुरे, विद्या भिवगडे, मिलिंद रामटेके, जि.प. सदस्य दिलीप उके, थारनोद डाकरे, एकनाथ फेंडर, आकाश काकडे, डॉ. आर.के. सिंग, विलास काकडे यांनी खासदार नाना पटोले यांच्यासमोर रेल्वे स्थानकावर असलेल्या समस्या मांडल्या. यात प्रवाशाच्या सुरक्षेसाठी या रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती, प्रवाशाकरीता प्लेटफार्म क्रमांक एक व दोनवर शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय आदी समस्यासह सायकल स्टॅन्डवर असलेल्या गर्दीमुळे होणाऱ्या अडचणी हे मुद्दे उपस्थित केले. या समस्या ऐकून खा.पटोले यांनी या रेल्वे स्थानकाच्या विकासाकरीता ७० लाख रूपये मंजूर झाले असून लवकरच प्रवाशी शेडचे बांधकाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय स्थानकातील समस्या सोडविण्याच्या सुचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. (वार्ताहर)