लाखांदूर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का?

By Admin | Updated: September 27, 2014 01:18 IST2014-09-27T01:18:15+5:302014-09-27T01:18:15+5:30

नाना पटोले यांचे विधानसभेचे नेतृत्व कधी कुणाच्या नशीबाचे दार खुले करण्यासाठी लोकसभेचे पायरी चढतील या प्रतीक्षेत सारेच असतांना.

Will Lakhandur Talukas lead the assembly? | लाखांदूर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का?

लाखांदूर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का?

लाखांदुर : नाना पटोले यांचे विधानसभेचे नेतृत्व कधी कुणाच्या नशीबाचे दार खुले करण्यासाठी लोकसभेचे पायरी चढतील या प्रतीक्षेत सारेच असतांना. पटोले तर खासदार बनले. मात्र, आमदारकीचे स्वप्नही तेवढेच खडतर बनले. या घाईगर्दीत लाखांदूर तालुक्याला पुन्हा एकदा पंचेवीस वर्षानंतर विधानसभेच्या नेतृत्वाची संधी मिळणार का ? म्हणून सारेच भाजपा नेते गुढघ्याला बाशींग बांधून आहेत.
भाजप आमदार तथा खासदार नामदेवराव दिवठे, माजी आमदार हिरालाल भैया सारखे दिग्गज व तत्वनिष्ठ राजकारणी तथा समाजकारणी तालूक्याला लाभले. तेव्हापासून भाजपा व कांग्रेसच्या यूवा तरुण व मनापासून राजकीय पिठ नसलेल्या यूवकांनी भविष्यात आमदारकीचे स्वप्न बघून पक्ष शिस्तीचे पालन केले.
यामध्ये माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. वसंता एंचिलवार, माजी जि.प. सदस्य वामन बोपचे यांनी तन-मन-धनाने पक्षाचे आदेश तथा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. राजकारणात कधीतरी जनसेवा करण्यासाठी मोठी संधी मिळेल याच हेतुने राजकारणात संपूर्ण वेळ दिला. याच कालावधीत दयाराम कापगते यांना संधी मिळाली. अर्जुनी (मोर) व लाखांदुर विधानसभेचे नेतृत्व केले. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात झंजावती यूवानेता म्हणूनी चारही तालूक्यात लोकप्रियतेचा झेंडा गाढून आमदार बनण्याचा ऐतिहासीक मान खा. नाना पटोले यांना मिळाला. जनता व नागरिक तथा शेतकऱ्यांचा हिताच्या मागण्या संदर्भात बगावत करीत पक्षत्याग करीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
नाना पटोले हे एकदा खासदार बनले पाहिजेत म्हणून २०१३ च्या निवडणूकीत भाजपा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करुन पटोले यांना निवडून आणले. यामुळे आमदारकीचा मार्ग खुला झाला.
सन २०१४ विधानसभेत आता आपली जागा पक्की म्हणून जनसपंर्क वाढवित असतांना. साकोली विधानसभेकरिता भाजपातून चाळीस पेक्षा जास्त संभाव्य उमेदवार रांगेत उभे झाले. २५ वर्षापासून आमदारकीला पोरका लाखांदुर तालूक्याचा ऐंचिलवार किंवा वामन बेदरे सारखे नेतृत्व मिळणार म्हणून सारेच मात्र खुश होते.
तालुका भाजपा कार्यकर्त्यांची एकच मागणी पुढे येवू लागली. ऐंचिलवार किंवा वामन बेदरे. परंतु जर की हे दोन्ही नाव उमेदवारीतून काढले तर साकोली विधानसभेकरिता भाजपा गोटातून उभा राहिलेला तिसरा उमेदवार विजयाचे समिकरण पुर्ण करण्यास नापास झाल्याशिवाय राहणार नाही.
राकाँ किंवा काँग्रेस साकोली विधानसभा कोणत्या पक्षाला जाणार हेही समीकरण चर्चेत आहे. नेहमी कांग्रेसकडे असणारी साकोली विधानसभा यंदा सारे समीकरण बदलवून टाकणारी ठरु शकते. खासदार पटोले यांनी उमेदवारीबद्दल मौन पाडले आहे. मात्र भाजपा-राकाँ-काँग्रेस गोटातून तर्क वितर्क जोडले जात आहे. जेष्ठ भाजपा कार्यकर्ते दादा टिचकुले यांना भाजपातून उमेदवारी मिळाली तर कांग्रेसचे जेष्ठ माजी आमदार सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळु शकते.
उलट जर का यूवा भाजपा नेते बाळा काशिवार यांना भाजपातून उमेदवारी मिळाली तर यूवक वर्गाचे चाहते तसेच तडफदार, सार्वजनिक हित जोपासणारे विकास पुरुष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांना उमेदवारी राकांच्या गटातून मिळण्या संदर्भात चर्चा सुरु आहे.
लाखांदुर तालुक्यात राकाँ व काँग्रेस तर्फे संभाव्य उमेदवार दिसून येत नाही. मात्र भाजपातून अ‍ॅड. वसंता ऐंचिलवार व वामन बेदरे नाव चर्चेत आहे. पक्षाची बांधीलकी, शिस्त, पक्षश्रेष्ठीचे निर्देश व भाजपाचे ध्येय धोरणे याची योग्य जान असल्याचे तसेच भाजपात मागून मिळत नाही. पक्षाप्रति निष्ठा बाळगणाऱ्यावर अन्याय होत नाही. असे म्हणत पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय मान्य करणार असल्याचे ऐंचिलवार व बेदरे यांनी सांगितले.
मात्र तालूक्या बाहेरची उमेदवारी ही विजयाची समिकरणे बदलवू शकते. याच तीळमात्र शंका नाही. लाखांदुर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का? भाजप कार्यकर्त्यात तिव्र अपेक्षा वाढल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Will Lakhandur Talukas lead the assembly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.