चांदपुरात ग्रीन प्रोजेक्ट राबविणार

By Admin | Updated: February 16, 2015 00:42 IST2015-02-16T00:42:19+5:302015-02-16T00:42:19+5:30

चांदूपर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रिन प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे.

Will execute Green Project at Chandpur | चांदपुरात ग्रीन प्रोजेक्ट राबविणार

चांदपुरात ग्रीन प्रोजेक्ट राबविणार

चुल्हाड/सिहोरा : चांदूपर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रिन प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या शिबिरात नव्याने वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सातपुडा पर्वत रांगा, घनदाट जंगल तथा उंच टेकडीवर असलेला जागृत हनुमान देवस्थान भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानात दर्शनासाठी दाखल होणाऱ्या भाविकांना निसर्गाचे वैभव असलेले जंगल आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. देवस्थान परिसरातील वन वैभवाला कात्री लागली आहे. जुने वृक्षाचे अस्तित्व धोक्यात आली आहेत. गत वैभव निर्माण करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट समितीने कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. हा कृती आराखडा येत्या पावसाळ्यात राबविण्यात येणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड आणि विजेचे खांब कमी केली जाणार आहेत. उंच टेकडीवर मैदान निर्माण झाले आहे. घनदाट जंगल ओसाड आहे. या जागेत वृक्ष लागवड केली जाणार आहे. २० हजार वृक्ष लागवडीचा उद्देश गाठण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम राबविताना भक्त भाविकांचा यात सहभाग घेतला जाणार आहे. त्यांच्या आठवणींना उजाडा देण्यासाठी वृक्ष लागवड केली जाणार आहे. यामुळे देवस्थान परिसरात पुन्हा हिरवळ निर्माण होणार आहे.
दरम्यान अन्य जागेत विकासाचा कृती आराखडा आहे. परंतु जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने कृती आराखडा राबविताना अडचणी येत आहे. चांदपूर हे नाव जिल्ह्याचे रोड मॉडेल ठरू पाहत आहे. ग्रिन व्हॅली पर्यटन स्थळ, जागृत देवस्थान, नागरिकांचे जीवनमान, ब्रिटीशकालीन जलाशय, चांद शाँ वली दरगाह, ऋषीमुनी आश्रम, आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मानाचा तुरा रोवण्याची क्षमता या चांदपुर गावात आहे.
महामंडळाचे अधिकारी अधिवेशन काळात सर्वेक्षण करून निघून गेले. येत्या २०१६ च्या हिवाळी अधिवेशनपर्यंत हे पर्यटनस्थळ विकसित होणार याबाबत अनिश्चितता आहे. देवस्थानात वाहनाने उंच टेकडीवर ये-जा करणारा रस्ता आहे. या रस्त्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. ग्रिन प्रोजेक्ट अंतर्गत वृक्ष लागवड, विजेची रोषनाई आदीचे नियोजन करण्यात आली असून पर्यटन स्थळाचा प्रश्न लवकर मार्गी लावला पाहिजे, असे माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष अजय खंगार व सचिव तुलाराम बागडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Will execute Green Project at Chandpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.