मंत्रिमंडळात जिल्ह्याची वर्णी लागणार का?
By Admin | Updated: October 28, 2014 22:52 IST2014-10-28T22:52:21+5:302014-10-28T22:52:21+5:30
१५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आले आहे. भाजपाच्या नवीन सरकारमध्ये भंडारा जिल्ह्यातून एक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मंत्रिमंडळात जिल्ह्याची वर्णी लागणार का?
भंडारा : १५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आले आहे. भाजपाच्या नवीन सरकारमध्ये भंडारा जिल्ह्यातून एक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा भाजपाने दारून पराभव केला. नरेंद्र मोदींच्या लाटेत भंडारा - गोंदिया जिल्ह्यात विकासाची कामे खेचून आणणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री खा.प्रफुल पटेल यांना मतदारांनी नाकारले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपाने विदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांचा सफाया केला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच उमेदवार निवडून आले. त्यामुळे मोदींची लाट ओसरायला लागली, असे म्हणणाऱ्यांवर डोक्यावर हाथ मारण्याची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्यात पूर्वी तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रात मधुकर कुकडे व राम आस्वले यांनी हॅट्रीक केली होती. त्यांच्या पक्षवाढीचा लाभ भाजपाच्या उमेदवारांना झाला. आज भंडारा जिल्हा भाजपमय झाला आहे. १५ वर्ष सातत्य राखणाऱ्या आमदारांना मंत्री होता आले नाही, याचे शल्य मतदारांना आहे.
मतदारांनी भाजपाचे सरकार आल्यामुळे जिल्ह्यातील तीन आमदारापैकी कोणाच्यातरी नशिबात मंत्रीपद येईल, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात भाजपाचे मंत्री, कोण बनणार यापेक्षा भंडारा जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार कां? याची आशा बाळगून असणारे अधिक आहेत. बघुया तीनपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते ते. (जिल्हा प्रतिनिधी)