तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:16+5:302021-04-15T04:34:16+5:30
तुमसर शहर व तालुक्याकरिता एकमेव सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत ...

तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविणार काय?
तुमसर शहर व तालुक्याकरिता एकमेव सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या २० ते २५ अधिकच्या रुग्णांवर येथे भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांची परिस्थिती पाहून येथील डॉक्टर्स त्यांना भरती करून घेतात. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यांचाही नाईलाज आहे.
सुभाषचंद्र बोस रुग्णालय १०० खाटांचे आहे. परंतु सध्या कोरोनाची बिकट झालेली परिस्थिती बघता येथे अधिक बेड मंजूर करण्याची गरज आहे. बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांना भंडारा व नागपूर येथे जावे लागते. सर्वसामान्य गरिबांना ते परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती निवारण विभागाने येथे किमान ५० खाटांची परवानगी देण्याची गरज आहे.
गोबरवाही परिसरात मॉईलने सीएसआर अंतर्गत काही ठिकाणी सभागृह बांधकाम केलेले आहे. सध्या ते सभागृह रिकामे आहेत. या रिकाम्या सभागृहातही कोविड सेंटर सुरू केल्यास त्या परिसरातील रुग्णांना सोयीचे होऊन त्यांना तत्काळ उपचार प्राप्त होईल. याकडे जिल्हा आपत्ती निवारण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.