दृष्टीहीन ‘गुरूदेव’ला देवदूत तारणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:29 IST2017-08-06T21:26:27+5:302017-08-06T21:29:18+5:30

संतती हीच खरी संपत्ती आहे, या विश्वविख्यात ओळीला सार्थक समजणाºया माय-बापांची संख्या किती असावी, ही बाब दारोदारी फिरूनही मोजता येणार नाही.

Will the angel save the blind 'Gurudeva'? | दृष्टीहीन ‘गुरूदेव’ला देवदूत तारणार काय?

दृष्टीहीन ‘गुरूदेव’ला देवदूत तारणार काय?

ठळक मुद्देभावड येथील रहिवासी : मदतीच्या आशेने पालकांची दाहिदिशा

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संतती हीच खरी संपत्ती आहे, या विश्वविख्यात ओळीला सार्थक समजणाºया माय-बापांची संख्या किती असावी, ही बाब दारोदारी फिरूनही मोजता येणार नाही. पोटचा गोळा दिव्यांग जन्मला तर त्याची कधी-कधी हेळसांडही होते. मात्र ओळीला एक दाम्पत्य सार्थक ठरवित आहेत. जन्मत: दृष्टीहीन व अपंगत्व असलेल्या एका बालकाच्या पालनपोषणची मोठी जबाबदारी दीन दाम्पत्यावर येऊन ठेपली आहे. गुरूदेव संघपाल चिचमलकर (९) रा. भावड असे दिव्यांग बालकाचे नाव आहे.
पवनी तालुक्यातील भावड येथील रहिवासी असलेल्या संघपाल चिचमलकर यांचे लग्न सुरेखा यांच्याशी झाले. संसाररूपी वेलीवर प्रथम मयुर नामक बाळाने जन्म घेतला. सिलिंगच्या हिस्स्यातून मिळालेली अर्धा एकर शेती व शेतमजुरीच्या जोरावर सासंरीक प्रपंच कसाबसा सुरू होता. अशातच सन ३० मे २००८ मध्ये गुरूदेवचा जम्न झाला. ओठ व नाकपुड्या यामध्ये अंतर नसल्याने चेहरा विद्रुप. अशातच डोळ्जांनाही शंभर टक्के अंधत्व.
माणूस चेहºयाने नव्हे तर विचाराने व त्याच्या कर्माने जाणला जातो. माफ करावे पंरतू, नऊ वर्षाच्या गुरूदेवच्या चेहºयाकडे बघितल्यास थोडा वेळ पाहण्याची इच्छा होत नाही. विधाताच्या कृतीला आपण तिरस्कार तरी कसा करावा.
जन्मल्यावर त्याला अलगद कडेवर उचलण्याचे धाडसही कुणी केले नाही. ज्या माऊलीने गुरूदेवला नऊ महिने पोटात वाढविले, जन्म दिला, तिने कधीही गुरूदेवचा तिरस्कार केला नाही. संतती कशीही असो आपण त्याचा सांभाळ करायचाच असा चंग त्यांनी बांधला.
घरी अठरा विश्व दारिद््रय. अशा स्थितीत दोन्ही मुलांचे संगोपन अशक्य बाब. चिचमलकर दाम्पत्य खंबीर झाले. दिव्यांग स्थितीमुळे गुरूदेवची माणसिक स्थितीही काहीशी डगमगलेली. गुरूदेवला सांभाळायला एक जण आवश्यकच.
चहा, बिस्कीट व मागितला तर भात, अशी गुरूदेवची दिवसभराची न्याहारी. पोटभर अन्न कधी त्याने खाल्लेच नाही. लहरी स्वभाव, ओरडणे, सतत हातवारे करणे हा त्याची दिनचर्याच झाली आहे.
दानदाते समोर येणार काय?
गुरुदेवचा उपचार शक्य नसल्याने त्याचा आयुष्यभर सांभाळ करण्यासाठी चिचमलकर दाम्पत्यांचा खटाटोप सुरु आहे. अशा स्थितीत त्यांना गावातील देवेंद्र हजारे यांनी कित्येकवेळा मदतीचा हात देवू केला आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही १० हजार रुपयांची मदत केली. परंतु घरातील दारिद्रता गुरुदेवच्या भविष्यकालीन जीवनावर बोट दाखवित आहे. समाजसेवी संस्था व अन्य दानदाते समोर येवून गुरुदेवच्या पालनपोषणासाठी मदत करणार काय? देवदूत त्याला तारणार काय असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या दानदात्यांना मदत करायची आहे, अशांनी गुरुदेवच्या नावे पवनी येथे असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियामधील खाते क्रमांक ३६८७४१७०८२३ येथे मदत जमा करता येईल.
शासकीय मदत शून्य
गुरूदेव जन्मत: अंध असल्याचे प्रमाणपत्र आरोग्य विभागाने देऊ केले आहे. मात्र प्रमाणपत्राचा उपयोग काय? असा प्रतिप्रश्नच त्याचे पालक विचारतात. चेहरा विद्रुप असल्याने मले घाबरतात, यामुळे शासकीय अंध विद्यालयाची दारेही त्याच्यासाठी बंद झालीत. भावड येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत नावापुरते गुरूदेवचे नाव घातले आहे. उठ, खाली बस, ताठ रहा हेच काही मोजकेच शब्द त्याला समजतात. शासकीय मदत मिळावी, यासाठी कुणीही मदतही केली नाही.

Web Title: Will the angel save the blind 'Gurudeva'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.