वन्यप्राणी प्रगणना आज
By Admin | Updated: May 21, 2016 00:31 IST2016-05-21T00:31:52+5:302016-05-21T00:31:52+5:30
नागझिरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात शनिवारी सकाळपासून रविवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.

वन्यप्राणी प्रगणना आज
२४ तास गणना : १९२ मचाणी, २०३ प्राणिगणकांचा सहभाग
साकोली : नागझिरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात शनिवारी सकाळपासून रविवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. त्यासाठी १९२ मचाणी पाणवठ्याजवळ उभारण्यात आले असून २०३ निसर्गप्रेमी प्राणीेगणना करणार आहेत.
नागझिरा अभयारण्यातील परिक्षेत्रात ५९ मचाणीवर ७० निसर्गप्रेमी प्राणीगणना करणार आहे. नवीन नागझीरा येथे ४१ मचाणीवर ४१ प्राणीगणना निसर्गप्रेमी, कोका २२ मचाणी, २२ प्राणी गणकाची क्षमता नवेगाव पार्क ४२ मचाणीवर ४२ क्षमता, मचाणी ४२ क्षमता प्राणीगणकाची आहे. २०३ निसर्गप्रेमी प्राणीगणक १९२ मचाणीवरुन प्राणी गणना करणार आहेत.
एका मचाणीवर वनविभागाचे एक प्रतिनिधी व स्वयंसेवी अशा दोन व्यक्तींकडून गणना केली जाईल, प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी १५० रुपये शुल्क आकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राणीगनणेत महिलांचाही सहभाग राहणार आहे. चंद्रप्रकाशात प्राणीगणना केली जाणार आहे. परंतु ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास या प्राणीगणनेवर प्रभाव पडू शकते. (शहर प्रतिनिधी )
कोका अभयारण्यात २२ मचाणी
- आमगाव (दिघोरी) : कोका अभयारण्यामध्ये २२ मचाणाहून प्रगणना केली जाणार असून वन्यप्राण्यांची प्रजाती व संख्या किती माहिती मिळणार आहे. वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. त्या प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. अभयारण्यात कोणत्या प्रकारचे किती प्राणी आहेत यासाठी पाणवठ्याजवळ जंगलामध्ये मचाण बांधणी करण्यात आली आहे. या मचाणावर रात्रभर राहून निसर्गप्रेमींना प्राण्यांची मोजमाप करता येणार असून निसर्गाचा आंनद उपभोगता येणार आहे. एका मचाणावर १ निसर्गप्रेमी व सोबत वनविभागातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पाणी, चहा व नास्त्याची व्यवस्था वनविभागाकडून करण्यात येणार आहे.
- ही प्रगणना २१ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून २२ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रगणकाला एका व्यक्तीला घेऊन जाता येत होते. आता मात्र वनविभागाबाहेरील एकाच व्यक्तीला मचाणावर बसण्याची मुभा आहे. महिला प्रगणक असेल तर त्यासोबत महिला गार्ड देण्यात येणार आहे.
- यावर्षी पहिल्यांदाच प्रगणकाकडून १५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची सर्वसधारण संख्या प्रजाती किती, वेगवेगळ्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचा प्रसार याबाबत अंदाज घेणे तसेच पाणवठ्या जवळील वन्यप्राण्यांचा आढावा घेणे आदी उद्देश या वन्यप्रगणनेचे असून या मोहिमेसाठी अभयारण्य विभाग सज्ज असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कोका वन्यजीव अभयारण्याचे परिक्षेत्राधिकारी आशुतोष शेंडगे यांनी केले आहे.