wild boar | सुकळीत रानडुकरांचा हैदोस

सुकळीत रानडुकरांचा हैदोस

ठळक मुद्देधान पुंजण्याचे प्रचंड नुकसान : आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या सुकळी (नकुल) गावाच्या शेतशिवारात असलेल्या धान पुंजण्याची प्रचंड नासाडी रानडुकरांनी केली आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी आहे.
सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे तयार केलेले आहे. संपूर्ण पुंजण्यांची नासधुस रानडुकरांनी केली आहे. यामुळे त्यांनी घरात अन्नाचा एक दानाही आणला नाही. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी सचिन यांनी बपेरा वन विभाग कार्यालयात माहिती दिली. कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्यांना आवश्यक दस्तावेज तयार करण्याकरिता सांगितले. तथा नुकसानीचा पंचनामा करणार असल्याची माहिती दिली. परंतु आठवडाभराचा कालावधी लोटला असताना तीन किमी अंतरावर असणारे कर्मचारी शेतशिवारात पोहचले नाहीत. यानंतर सचिन रहांगडाले यांनी तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गाठले. कार्यालयात असणाºया कर्मचाऱ्यांना त्यांनी नासाडीचे फोटो दाखविले तथा मदत कार्यात सहकार्य सांगितले. परंतु असहकार्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली.
या शिवाय धान पुंजणे नासाडीची मदत शासनाकडून मिळत नाही, असे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. ओला दुष्काळाचा अनुभव घेत असताना शेतकरी शेतशिवारात अन्न धान्य बचावासाठी प्रयत्न करित आहे. या अन्नधान्याची नासाडी वन्यप्राणी करित असल्याने शेतकऱ्याची आता जगण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त मदतीच्या नावावर वन विभागाची यंत्रणा हात झटकत आहे. धान पुंजण्याना आर्थिक मदत नियमात नसेल तर लोकसभेत तसा मदतीचा कायदा पारित करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी नुकसान सोसत आहे. वन विभागाची यंत्रणा मदतीकरिता उदासिन दिसून येत आहे.

धान पुंजण्यांचे नुकसान रानडुकरांनी केले असताना वन विभागाची यंत्रणा असहकार्याची भूमिका घेत आहे.
-संजय रहांगडाले, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी नकुल.

Web Title: wild boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.