पत्नीवर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: February 24, 2015 01:39 IST2015-02-24T01:39:57+5:302015-02-24T01:39:57+5:30

मध्य प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाला. यात

Wife assault | पत्नीवर प्राणघातक हल्ला

पत्नीवर प्राणघातक हल्ला

तुमसर : मध्य प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाला. यात पतीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून जबर जखमी केले. ती मृत पावली, असा समज करून पतीने पळ काढला. नशिब बलवत्तर असल्याने ती यातून वाचली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
मध्यप्रदेशातील सिवनी येथील दिनेश नेमा हा पत्नी दीक्षासह १६ फेब्रुवारीपासून व देवदर्शनाच्या प्रवासासाठी घरून निघाले. तालुक्यातील सोदेपूर येथील जंगलात दोघांमध्ये वाद झाला.
वाद विकोपाला गेल्याने दिनेशने दीक्षाच्या डोक्यावर हातोड्याने जबर प्रहार केला. यात ती रक्ताच्या थारोड्यात बेशुद्धवस्थेत पडली. ती मृत पावली असावी, असा संशय दिनेशला आल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान जंगलातून जाणाऱ्या नागरिकांना ती दिसली.
याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी दीक्षाला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नशिब बलवत्तर असल्याने दिक्षा यातून वाचली. याप्रकरणी पोलिसांनी पती दिनेशविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दिनेशचा सिवनी येथे बॅटरी दुरूस्तीचा व्यवसाय आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात गोबरवाहीचे ठाणेदार आर.बी. वडाळकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wife assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.