शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

कुणाची सत्ता येणार, काेण हाेणार अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष निवडून आले. मतदारांनी कुणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे निवडणूक निकाल लागताच जुळवाजुळव सुरू झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रामविकास मंत्रालयाचे पत्र आले. निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा जीव भांड्यात पडला. आता पुन्हा सत्ता समीकरणे जुळविण्याला वेग आला. मात्र, कुणालाही जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने कुणाची सत्ता येणार व काेण जिल्हा परिषद अध्यक्ष हाेणार अशा चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष निवडून आले. मतदारांनी कुणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे निवडणूक निकाल लागताच जुळवाजुळव सुरू झाली. सर्वात माेठा पक्ष काँग्रेस असल्याने त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही असे बाेलले जात हाेते. राष्ट्रवादी काँग्रेससाेबत जाईल अशा सर्वांचा अंदाज हाेता आणि आताही आहे. मात्र, नेत्यांनी काेणताही काैल दिला नाही. अशातच सत्ता स्थापनेची अधिसूचना लांबत गेली आणि सत्ता स्थापनेची चर्चा पुन्हा अडगळीत पडली.तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गत मंगळवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने पत्र काढले. पंचायत समिती सभापती आरक्षण साेडत काढण्याची सूचना दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा झाला.आता पुन्हा सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार की आणखी नवे समीकरण जन्माला येणार याबाबत चर्चा सुरू आहे.अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आता २२ एप्रिल राेजी पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण साेडत निघाल्यानंतर नेते काय निर्णय घेतात आणि कुणाची सत्ता स्थापन हाेते हे कळणार आहे. तूर्तासतरी केवळ चर्चांना उधाण आले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काेण विराजमान हाेताे याची उत्सुकता आहे.

२१ महिन्यांचे दीर्घ प्रशासक राज संपुष्टात येणार- जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० राेजी संपली. मात्र त्या काळात काेराेना संसर्ग असल्याने निवडणूक घेणे शक्य नव्हते. परिणामी १६ जुलै राेजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने मिनी मंत्रालयाच्या कारभार सुरू आहे. १९ जानेवारीला निकाल घाेषित झाल्यानंतरही तब्बल चार महिने सत्ता स्थापनेसाठी प्रतीक्षा करावी लागली. जवळपास २१ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशासकराज जिल्ह्याचे अनुभवले.

नेत्यांचे माैन अन्  इच्छुक अस्वस्थ- तब्बल तीन महिन्यांनंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र नेते अद्यापही माैन आहेत. काेणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारले तर लवकरच निर्णय हाेईल, असे उत्तर दिले जाते. नेते काहीच बाेलत नसल्याने इच्छुक मात्र अस्वस्थ हाेत आहे. काहींना नेत्यांनी शब्द दिला आहे तर काही स्पर्धेत आहेत. त्यांचा जीव मात्र टांगणीला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषद