शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 02:35 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला.

भंडारा : संपूर्ण देशाला हादरवून साेडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला जबाबदार काेण असा एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. त्या रात्री विशेष नवजात अतिदक्षता कक्षात नियुक्त असलेले ‘ते’ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी काेण? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. कक्षाला बाहेरून कडी लावून गेलेल्या ‘त्या’ नर्सचे नाव सांगण्यास प्रशासन दाेन दिवसांपासून टाळाटाळ करीत असून आराेग्य यंत्रणेतील कुणीही या विषयावर बाेलायला तयार नाही. यामागचे काय गाैडबंगाल आहे, हे कळायला मार्ग नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला. या कक्षात डाॅक्टर, नर्स, वार्ड बाॅय असणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे हा कक्ष अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जाताे. तेथे बालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिचारिकांची नियुक्ती असते. नियमाप्रमाणे  इनक्यूबेटरजवळ नर्स असणे बंधनकारक आहे. मात्र घटना घडली त्यावेळी नर्स कक्षात नसल्याची माहिती आहे. 

फायर ऑडिटच्या स्पष्ट सूचनाn भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना नेमकी कशी घडली, यामागचे तांत्रिक कारण काय याबाबतची संपूर्ण तपासणी सहा सदस्य असलेली चौकशी समिती करणार आहे. n फायर आणि सेफ्टी यासंदर्भात राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे किंवा नाही याची चाचपणीही करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे ऑडिट झाले असेल तरीही पुन्हा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगfireआग