शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

आपला आमदार कोण? आज करा फैसला ! तिन्ही मतदारसंघात काट्याची टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:24 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदारसंघावर सर्वांचीच नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात २० मोव्हवरला मतदान होणार आहे. मतदार राजा या तीनही मतदारसंघात कोण आमदार होणार याचा फैसला करणार आहेत. यासाठी पोलिंग पार्ष्या मंगळवारी आपापल्या मतदान केंद्रस्थळी पोहचले आहेत. मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रारंभ होणार आहे.

जिल्ह्यात तुमसर, भंडारा व साकोली मतदार संघ मिळून एकूण १० लाख १६ हजार ८७० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा पूर्ण तयारीनिशी आहे. मंगळवारला तीनही विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयातून संबंधित मतदान केंद्रांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात आले. यासाठी तीनही मतदार संघात १३४ एसटी बसेससह खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे.

तीनही मतदार संघाच्या मुख्यालयी मंगळवार सकाळी ८ वाजतापासूनच मतदान साहित्य घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोहचले होते. टप्प्याटप्प्याने या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात आले. पोलिस कर्मचारीही आपल्या कर्तव्यस्थळी रुजू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रशासनाच्या नजरेत कमकुवत केंद्रांवरही उत्तम व्यवस्था व्हावी याची काळजी घेण्यात आली आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर काय असतील सुविधा?जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात १ हजार १६७ मतदान केंद्र आहेत. या सर्वच केंद्रांमध्ये आरोग्य सुविधांसह पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृहाची सोय करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्था आहे की नाही याची काळजी घेतली आहे. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पसह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना यादीत नावे दिसावी यासाठी कर्मचारीही मदत करणार आहेत. वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा