निमगावात पांढऱ्या उंदरांचे प्रजनन
By Admin | Updated: February 16, 2015 00:39 IST2015-02-16T00:39:29+5:302015-02-16T00:39:29+5:30
शीर्षक वाचून कदाचित दचकलात असाल. परंतु भंडारा शहरापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या निमगाव येथे पांढऱ्या उंदरांची पैदास करण्यात येत आहे.

निमगावात पांढऱ्या उंदरांचे प्रजनन
प्रशांत देसाई भंडारा
शीर्षक वाचून कदाचित दचकलात असाल. परंतु भंडारा शहरापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या निमगाव येथे पांढऱ्या उंदरांची पैदास करण्यात येत आहे. वैद्यकीय आणि औषध अभ्यासशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हे उंदीर दिले जातात.
जगात राखडी आणि पांढऱ्या रंगाचा उंदीर आढळतो. पांढरा रंगाचे उंदीर कुठेही बघायला मिळत नाही. आणि या उंदिराची पैदासही कुणी करीत नाही. विदर्भात पोषक वातावरण नसल्यामुळे पांढऱ्या उंदिराचे प्रजनन होण्यासाठी अडचणी येत आहेत.
भंडारा येथे पशुवैद्यकीय पदविकाधारक डॉ. संजय एकापुरे यांनी नोकरीच्या मागे वेळ न घालवता शेतीतून आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी निमगाव येथे शेती विकत घेतली. त्यात त्यांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय व पांढरे उंदीर, गिनीपिग पालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरू केला. पोषक वातावरणाअभावी उंदिराचे प्रजनन हे जोखीमेचे काम होते. परंतु, न डगमगता एकापुरे यांनी हा संकल्प सिद्धीस नेला.
पुणे येथील ‘इंडियन व्हेटरनरी बॉयलॉजिकल प्रोटेक्ट’कडून (आयव्हीबीपी) एकापुरे यांनी सन २००८ मध्ये पांढरे उंदीर, गिनिपिग खरेदी केले. त्यासाठी त्यांना २२ हजार रूपयांचा खर्च आला. नोकरी न करता अशक्यप्राय जोडधंदा सुरू केल्यानंतर काहींनी मित्रांनी टिंगल केली, तर काहींनी प्रोत्साहन दिले. मात्र, परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्धार केलेल्यामुळे ते व्यवसायात सरस ठरले. मादी एका वेळेस सहा पिलांना जन्म देते. १८ ते १९ दिवसांचा प्रसुती काळ असतो. दोन महिन्यात पिले मोठे होतात.
दर तीन महिन्यानंतर मादी प्रसुत होत असते. त्यानंतर ही पिले वैद्यकीय आणि औषध अभ्यासशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी महाविद्यालयांच्या मागणीनुसार विकले जातात. ही विक्री केवळ ‘कमिटी फॉर दी परपज आॅफ कंट्रोल अॅण्ड सुपरव्हिजन एक्सप्रिमिनल अॅनिमलशी’ (सीपीसीएसईए) संलग्नित महाविद्यालयांनाच विकले जातात.