लाच घेताना तलाठ्याला पकडले

By Admin | Updated: April 24, 2015 00:27 IST2015-04-24T00:27:07+5:302015-04-24T00:27:07+5:30

सात बारावर कर्जाबाबत परतफेड केल्याची नोंद करून देण्यासाठी हजार रूपयांची लाच स्विकारताना तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजर्ग येथील तलाठ्याला आज रेंगेहात पकडण्यात आले.

While taking a bribe, he got caught by Rakha | लाच घेताना तलाठ्याला पकडले

लाच घेताना तलाठ्याला पकडले

भंडारा : सात बारावर कर्जाबाबत परतफेड केल्याची नोंद करून देण्यासाठी हजार रूपयांची लाच स्विकारताना तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजर्ग येथील तलाठ्याला आज रेंगेहात पकडण्यात आले. ओमशंकर नथुजी कटरे असे या तलाठ्याचे नाव आहे.
ही कारवाई भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तक्रारकर्त्याने या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्याची शहानिशा करून तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापडा रचण्यात आला. शेतीवर बँककडून कर्ज घेतले होते. यासंदर्भात सदर शेतकऱ्याने त्याची परतफेडही केली होती. मात्र सात बारावर कर्ज नसल्याची नोंद करण्यासाठी डोंगरी बुजर्ग येथील साझा क्रमांक ४ चे तलाठी ओमशंकर कटरे यांनी एक हजार रूपयांची मागणी सदर शेतकऱ्याकडे केली होती. त्यानुसार आजची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एसीबीचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, नायक पोलीस कॉस्टेबल अशोक लुलेकर, सचिन हलमारे, विनोद शिवणकर, मनोज पंचबुद्धे आदींनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)

Web Title: While taking a bribe, he got caught by Rakha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.