शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

बालकामगारांच्या जीवाची पर्वा कुणाला?

By admin | Updated: June 11, 2014 23:10 IST

‘‘बालपण दे गा देवा, जसा तोंडात साखरेचा रवा’’ या म्हणीप्रमाणे बालपणीचा काळ म्हणजे सुवर्णकाळ असतो. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यातील हा बालपण सारखाच असेल, असे नाही. जगातील बहुतांश बालके

भंडारा : ‘‘बालपण दे गा देवा, जसा तोंडात साखरेचा रवा’’ या म्हणीप्रमाणे बालपणीचा काळ म्हणजे सुवर्णकाळ असतो. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यातील हा बालपण सारखाच असेल, असे नाही. जगातील बहुतांश बालके आजही बाल कामगार म्हणून आपले जीवन जगत आहेत. ना कुणाचीही सामाजिक बांधिलकी व प्रयत्नांचे फळ त्यांच्या नशिबी अजूनही आलेले नाही. बाल कामगारांच्या जीवाची पर्वा कुणाला आहे असा हाडामांसाला सडेतोड उत्तर देणारी संजीवनी तरी मिळालेली नाही. दि.१२ जून हा जागतिक बाल मजुरी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येत असताना समाजात जनजागृतीपर आम्ही ही छोटेखानी माहिती आपल्या वाचकांना देत आहोत. भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात आहे. त्यात किशोरावस्था गाठलेल्यांची संख्या ३५ ते ४० टक्क्यांच्या घरात आहे. या पैकी जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त बाल कामगारांची संख्या आहे. ही आकडेवारी अनधिकृत असली तरी वास्तविकतेला धक्का देणारी आहे. शासकीय दप्तरी बालकामगारांची संख्या ही फक्त बोटांवर मोजण्याइतकीच आहे. बालकांचे हक्क, त्यांचे अधिकार हिरावून घेऊन त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत कित्येक ठिकाणी त्यांना राबवून घेतले जाते. इमारत बांधकाम असो की उपहारगृह असो, बुटबॉलिश असो की चहाच्या टपरीवर असो. बालकामगार आपल्याला हमखास दिसतात. या बालकामगारांच्या डोळ्यातील वेदना प्रत्येकाला खुणावत असल्या तरी त्यांच्या हक्कासाठी लढणारा देवदूत तरी अजूनपावेतो मैदानात उतरलेला नाही. (शहर प्रतिनिधी)