कोरोना चाचणी असो वा लसीकरण, गर्दी होणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:26+5:302021-04-03T04:31:26+5:30

पवनी : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन नागरिक मोठ्या संख्येने कोरोना चाचणी करून घेत आहेत. वयोवर्ष ४५ च्या ...

Whether it's a corona test or a vaccination, there's going to be a rush! | कोरोना चाचणी असो वा लसीकरण, गर्दी होणारच!

कोरोना चाचणी असो वा लसीकरण, गर्दी होणारच!

पवनी : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन नागरिक मोठ्या संख्येने कोरोना चाचणी करून घेत आहेत. वयोवर्ष ४५ च्या पुढे कोणत्याही व्यक्तीला कोरोना लसीकरण करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय पवनी येथे जागेच्या नियोजनाअभावी चाचणी करून घेण्यासाठी असो वा कोरोना लसीकरणासाठी गर्दी होणारच आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, हे वारंवार सांगितले जात आहे. मात्र बाजार भरला की गर्दी होणार, प्रवासात गर्दी होणार, लग्न समारंभ व अंत्ययात्रेसाठी गर्दी ही ठरलेलीच आहे.

निदान कोरोना चाचणी व कोरोना लसीकरण या दोन्ही बाबी आरोग्य विभागाच्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे निदान या ठिकाणी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन व्हावे. हे अपेक्षित आहे. पण येथेही नियमांची पायमल्ली होत आहे. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय परिसरातील ज्या इमारतीत कोरोना चाचणी व कोरोना लसीकरण करण्यात येत आहे, त्या दोन्ही इमारती निर्लेखित करण्याच्या स्थितीत आहेत. इमारतीसमोर रांगेत उभे राहण्यासाठी किंवा रांगेत बसण्याची व्यवस्था नाही. मात्र याच ठिकाणी कोरोना चाचणी व लसीकरण केले जाते आहे. याठिकाणी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग होऊ शकत नाही, याची कोणी हमी दिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील या गैरसोयीकडे वरिष्ठ अधिकारी व पालिका लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Whether it's a corona test or a vaccination, there's going to be a rush!