कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

By Admin | Updated: October 11, 2014 22:59 IST2014-10-11T22:59:32+5:302014-10-11T22:59:32+5:30

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण मतदारसंघातील प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध पक्ष कार्यालयात सध्या लगबग सुरू आहे. विरोधकांचे नेमके काय चालले आहे

Where the workers are busy; Where to arrange meetings | कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

भंडारा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण मतदारसंघातील प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध पक्ष कार्यालयात सध्या लगबग सुरू आहे. विरोधकांचे नेमके काय चालले आहे आणि त्यांना शह देण्यासाठी काय करता येईल, याची खलबते पक्ष कार्यालयातील बंद खोलीत होऊ लागली आहेत. दिवसभराच्या नियोजनासोबतच कार्यकर्त्यांशी संपर्क आणि रॅली आणि कॉर्नर बैठकांच्या नियोजनात कारभारी व्यस्त आहेत.
सर्व पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचार मोहिमेवर निघण्याची लगबग सकाळी १० वाजता सुरू होती तर काही कार्यकर्ते कॉर्नर बैठका, मेळावे, सभा याच्या आयोजनात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा राबता या कार्यालयात असल्याचे पहायला मिळाले.
भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते गाद्यांवर लेटले होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघतो याची वाट पहात कार्यकर्ते बसले होते. आपल्या गाडीत कोण कोण असणार, याचेही नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चालले होते.
शहरातील कॉर्नर बैठकांना हजर राहा म्हणून प्रचार प्रमुख कार्यकर्त्यांना सांगत होते. कोणत्या गावात कॉर्नर बैठका घ्यायच्या याबाबतही नियोजन सुरू होते. पुढील दोन दिवस मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या सभांचे नियोजन पहिल्या फळीतील कार्यकर्ते करीत होते.
कुठल्या गावांना वाहने पाठवून कार्यकर्ते गोळा करायचे. गावागावातील कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सभांना, मेळाव्यांना, प्रचारफेऱ्यांना हजर राहण्याबाबतही विनंती केली जात होती. तर काही कार्यकर्त्यांवर पॉम्प्लेट वाटण्याची जबाबदारी दिली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारफेऱ्यांचे नियोजन करताना काही कार्यकर्ते या कार्यालयावर आढळून आले. याकरिता सकाळच्यावेळी सर्वच पक्षाच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसून येते.
प्रचाराच्या दिवसांचे महत्व जाणत तर कामाव्यतिरिक्त अधिक वेळ कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालयात बसू ही दिले जात नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात मतदार संघात प्रचारफेऱ्या, बैठका, रॅलीचे आयोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांचे सर्व सोय करीत कार्यालयाच्या परिसरातच जेवणाच्या पंगती उठत आहेत.
कार्यकर्त्यांची चलती
निवडणुकांव्यतिरिक्त इतरवेळी दुरावलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान महत्व आले असल्याचे दिसत आहे. कार्यालयाच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत.
नाराज कार्यकर्त्यांच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी उमेदवारांकडूनच प्रयत्न केले जात आहेत. कार्यकर्ता दुरावून मतदारावर त्याचा परिणाम होऊ नये याकरिता तुमच्यासाठी काय पण, असे म्हणत कार्यकर्त्यांची कोणतीही मागणी मान्य केली जात आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या मोबाईलसाठी प्रचार करणारी रिंगटोनही डाऊनलोड करून दिली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Where the workers are busy; Where to arrange meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.