केव्हा घटणार वाहतूक शुल्क?

By Admin | Updated: January 24, 2015 22:49 IST2015-01-24T22:49:39+5:302015-01-24T22:49:39+5:30

डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयांनी पुर्वीचे वाहतूक दर कायम ठेवले आहे.

When will the transportation fee decrease? | केव्हा घटणार वाहतूक शुल्क?

केव्हा घटणार वाहतूक शुल्क?

भंडारा : डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयांनी पुर्वीचे वाहतूक दर कायम ठेवले आहे. २०१४-१५ हे शैक्षणिक वर्ष संपायला आता तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत वेळ मारून देण्याचा प्रयत्न बहुतांश शिक्षक संस्था करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. खासगी ट्रॉयव्हल्स एजन्सीकडूनही इंधन दर वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. डिझेलचे दर घटले. वाहतूकही मात्र जैसे थे या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लोकमतने विद्यार्थी वाहतूक प्रश्नाला वाचा फोडली होती. आता पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर दरात अनुक्रमे २.४२ आणि २.२५ रूपयांची कपात करण्यात आली आहे. तरीदेखील विद्यार्थी वाहतुकीचे दर कामय आहेत. एरवी पेट्रोल व डिझेलच्या दरात किरकोळ वाढ होताच महागाईचा भडका उडत असतो. मुलांच्या असलेल्या बसेस, रिक्षा, एस.टी., मिनीबस वाहतुकीत दर वाढ होते. याचाच अर्थ डिझेलचे दर घटताच रेल्वेभाडेही कमी होणार आहे. सद्यस्थितीत डिझेलच्या भावात घट झाली असताना बसची भाडेवाढ कमी होणे अपेक्षित होते. परंतु असे होताना दिसत नाही. परवानगी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनी आपले दर कमी केले नाही. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी शासनातर्फे शाळांना अनुदान तसेच इतर सवलती दिल्या जातात. विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या शालेय बसच्या करातही सवलत दिली जाते. परंतु शाळा मात्र भाववाढ कमी करण्यास तयार नसल्याचेच दिसते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: When will the transportation fee decrease?