झोपडपट्टीवासीयांना सुविधा केव्हा मिळणार?

By Admin | Updated: April 4, 2015 00:17 IST2015-04-04T00:17:35+5:302015-04-04T00:17:35+5:30

पवनी तालुक्यातील पालोरा येथील काही कुटूंबानी गावाच्या मध्यभागी अतिक्रमण करून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत.

When will the slum dwellers get the facility? | झोपडपट्टीवासीयांना सुविधा केव्हा मिळणार?

झोपडपट्टीवासीयांना सुविधा केव्हा मिळणार?

मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी : ग्रामपंचायतने पुढाकार घेण्याची मागणी
पालोरा (चौ.) :
पवनी तालुक्यातील पालोरा येथील काही कुटूंबानी गावाच्या मध्यभागी अतिक्रमण करून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत. मागील १० वर्षापासून वास्तव्याला असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामता काळोख्या अंदारात, चिखलाचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीत. जंगली डुकरे, सरपणारे प्राणी यांच्यापासून जिवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी झोपडपट्टीवासीयांनी केली आहे.
पालोरा हे गाव जवळपास दोन हजार लोकवस्तीचे आहे. येथे अनेक गरीब गरजू कुटूंब वास्तव्याला आहेत. जवळपास २० कुटूंबानी गावाजवळच्या खाली जागेवर अतिक्रमण केले आहे. मागील दहा वर्षापासून जीव मुठीत घेवून आपल्या कुटूंबासह राहत आहेत. संबंधित प्रशासनाने त्यांच्यावर दंड ही ढोकावला आहे. त्यांनी पोटाला मारून प्रशासनाकडे दंडही भरले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही.
प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र निवडणूक संपताच सर्व काही विसरले जात आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पथदिवे नाहीत, रस्ते नाहीत पावसाळ्यात तर सर्वत्र चिखल पाहायला मिळते. झोपडपट्टी सभोवताल पाणीच पाणी असते. दररोज रात्री कुणाच्या ना कुणाच्या झोपड्यात सरपडणारे प्राणी पहायला मिळतात. जीव मुठीत घेवून दररोज रात्र काढीत आहे.
पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काही सुविधा देण्यात यावे म्हणून येथील नागरिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येथील का? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: When will the slum dwellers get the facility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.