लाखनीत पिण्याचे पाण्याची समस्या केव्हा सुटणार ?

By Admin | Updated: October 17, 2015 01:05 IST2015-10-17T01:05:52+5:302015-10-17T01:05:52+5:30

जिल्हा परिषदची नळयोजना लाखनी, मुरमाडी व सावरी येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरी पडत असल्याने ...

When will the problem of drinking water? | लाखनीत पिण्याचे पाण्याची समस्या केव्हा सुटणार ?

लाखनीत पिण्याचे पाण्याची समस्या केव्हा सुटणार ?

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची मागणी : नगरपंचायतने प्राधिकरणाची योजना
चंदन मोटघरे लाखनी
जिल्हा परिषदची नळयोजना लाखनी, मुरमाडी व सावरी येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरी पडत असल्याने जीवन प्राधिकरणची योजना जिल्हा परिषदेने स्वीकारावी अशी जनतेची मागणी आहे. लाखनी शहराचे नगर पंचायतमध्ये रुंपातर झाल्याने लाखनी व मुरमाडीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरज निर्माण झाली आहे.
लाखनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची १.२५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेली नळयोजना १९८२ पासून कार्यरत आहे. साकोली तालुक्यातील जांभळी बंधाऱ्यातील पंपहाऊसवरुन पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यासाठी दोन विंधन विहीर आहेत. पाईपलाईन फुटलेली असल्याने पाण्याचा दुरुपयोग होत असतो. नळयोजना जुनी झाल्यामुळे जांभळीपासून येणारी पाईपलाईन निष्कृष्ट झालेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेद्वारे मागील सात ते आठ वर्षाेपासून ५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. चुलबंद बंधाऱ्यावरुन नळयोजना तयार आहे यामुळे लाखनी येथील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करता येतो. नळयोजनेचे ट्रायल घेण्यात आले. एक महिना पाणी पुरवण्यात आला. सदर नळयोजनेचा खर्च परवडणारा नसल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जीवन प्राधिकरणाची योजना स्वीकारण्यास नकार दिला आहे.
लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करुन राज्य शासनाने लाखनीचे नगरपंचायतमध्ये परिवर्तन केले आहे. लाखनी शहराची २० हजारावर लोकसंख्या आहे. त्यामुळे लाखनी व मुरमाडीसाठी स्वतंत्र नळयोजनेची गरज आहे. लाखनी नगर पंचायत झाल्यामुळे जीवन प्राधिकरणची योजना नगर प्रशासनाने स्किारल्यास लाखनीवासियांना पिण्याचे शुध्द पाणी मिळू शकेल. फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचा प्रश्न बिकट होतो. सद्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखनी शहरात सन २०१३-२०१४ मध्ये ५८७ जोडनी होती. थकित असल्यामुळे व पाणी पोहचत नसल्यामुळे जोडणी कमी करण्यात आले. सन २०१४-१५ मध्ये ग्राहकांची संख्या ३०६ वर आली आहे. सन २०१३-१४ ची पाणीपट्टी आकारणीचे उद्दिष्टय २५ लाख ११ हजार होते. त्यापैकी केवळ ४७ हजार वसुल झाले. सन २०१४-१५ चे १२ लाख ३१ हजार रुपये वसुलीचे उद्दिष्टय होते. त्यापैकी ५० हजार रुपये वसुल करण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचा हिसाब कामकाज, अधिकांऱ्याचा दुर्लक्षीतपणा यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली आहे. नळयोजनेची पाईप अनेक वर्षोपासूनचे असल्यामुळे अंतर्गत नळयोजनेची पाईप फिटींगवर भर देने आवश्यक आहे.
मुरमाडी (सावरी) येथे सन २०१३-१४ मध्ये ३३८ कनेक्शन होती त्यातील १६२ जोडणी बंद झाली आहे. सन २०१४-१५ मध्ये केवळ २१८ जोडणी शिल्लक आहे. सावरी येथील ३८ जोडणी अनेक वर्षोपासून बंद आहेत. सन २०१३-१४ मध्ये मुरमाडीचे वसुलीचे उद्दिष्ट १४ लाख ४९ हजार रुपये होते. त्यातील ६५ हजार रुपये वसूल करण्यात आले. सन २०१४-२०१५ मध्ये ९ लाख ३ हजार रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यातील ८० हजार रुपयाची वसुली झाली आहे. अशोका बिल्डकॉनद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असतांनी नळयोजनेमध्ये अनियमितता निर्माण झाली होती. पाणीपुरवठा विभागाचे काम ठप्प झाल्यासारखे होते. मुरमाडी व सावरी ह्या दोन्ही गावाची लोकसंख्या १५ हजारच्यावर आहे. त्यामुळे मुरमाडीसाठी जुनी पाण्याची टाकीसह स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.

Web Title: When will the problem of drinking water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.