रोजगार हमीची कामे केव्हा सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:00+5:302021-03-16T04:35:00+5:30

मार्च महिन्याचे १५ दिवस लोटले. परंतु रोजगार हमी कामांचे नियोजन अजूनपर्यंत दिसत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मजुरांच्या ...

When will the employment guarantee work start! | रोजगार हमीची कामे केव्हा सुरू होणार!

रोजगार हमीची कामे केव्हा सुरू होणार!

मार्च महिन्याचे १५ दिवस लोटले. परंतु रोजगार हमी कामांचे नियोजन अजूनपर्यंत दिसत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मजुरांच्या हाताला गावात कामे नाहीत. ग्रामीण मजुरांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. मागीलवर्षीचसुद्धा मजुरांना पाहिजे तशी कामे उपलब्ध झाली नव्हती. यामुळे जीवन जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांसमोर उभा आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच रोजगार हमी कामांचे नियोजन करण्यात येत होते. सध्या कामांची नितांत गरज आहे. अनेक मजुरांनी शहरातून गावांमध्ये पलायन केले आहे. त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. शासनाने किमान नव्वद दिवस नियमानुसार बेरोजगार ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची गरज आहे ग्रामीण मजूर कामाकरिता वणवण भटकत आहेत. त्यांची भटकंती थांबावी व त्यांच्या हाताला गावांमध्येच काम मिळावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: When will the employment guarantee work start!