शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कारधातील ब्रिटीशकालीन वैनगंगा पुलावरील वाहतूक कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 5:00 AM

वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरु आहे.

ठळक मुद्देदररोज शेकडो दुचाकी वाहनांची ये-जा सुरुच। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीवरील ९० वर्षापुर्वीच्या ब्रिटीशकालीन पुलावरुन आजही जीव मुठीत घेवून नागरिक प्रवास करीत आहेत. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जुना पुल पाण्याखाली दोनवेळा बुडला होता. यापुर्वीही अनेकदा पुराचे पाणी पुलावरून गेले आहे. सध्या पाण्याची पातळी अगदी जवळ असूनही अशास्थितीत पुलावरून शेकडो वाहनांची रहदारी सुरु आहे.वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरु आहे. कारधा व परिसरातील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने याच पुलाचा वापर करीत असतात. आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईप टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतू स्थानिकांना आवागमन करण्यास जुना पुल सोयीचा होत असल्याने लोखंडी पाईप काढण्यात आले. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद असली तरी पादचारी व दुचाकीची वाहतुक सुरु आहे.जिल्हाधिकाºयांच्या सुचनेकडे दुर्लक्ष तिन वर्षापूर्वी जिल्हाधिकाºयांनी निर्बंध घातल्यानंतरही वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुधडी भरून असून लहान पुलावरून जिव मुठीत घेवून धाकधुकीतच प्रवास करावा लागतो. तरीही वाहनचालक न जुमानता जीवघेणा प्रवास करतांना दिसत आहेत. याप्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सकाळी व सायंकाळी या पुलावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी नदीत वाहने कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरूंद आहे.पुलाची कालमर्यादा संपलीगोसे प्रकल्प झाल्यानंतर पाण्याची पातळी पुलापर्यंत राहते. पावसाळयात तर वैनगंगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतूकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने भरधाव जातात. यावर्षी पावसाळयात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत जिवघेणा प्रवास सुरु आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा