साकोली तहसील कार्यालयाची इमारत गळते तेव्हा !
By Admin | Updated: July 22, 2014 23:51 IST2014-07-22T23:51:42+5:302014-07-22T23:51:42+5:30
येथील तहसील कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयाच्या दुरुस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ही इमारत पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे येथील महत्वाचे दस्ताऐवज

साकोली तहसील कार्यालयाची इमारत गळते तेव्हा !
संजय साठवणे - साकोली
येथील तहसील कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयाच्या दुरुस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ही इमारत पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे येथील महत्वाचे दस्ताऐवज पाण्याने ओलेचिंब झाले आहेत. गळणाऱ्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या लावून ठेवलेल्या आहेत.
साकोली तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन असून या इमारतीची साधी डागडुजीही झालेली नाही. या तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या कार्यालयाची गरज पडते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही संपूर्ण इमारत गळत आहे. त्यामुळे या कार्यालयातील एकही रुम अशी नाही की त्यात पाणी गळत नाही. त्यामुळे कार्यालयातील महत्त्वाचा दस्ताऐवज गळणाऱ्या पाण्याने भिजला आहे. त्यामुळे आज या कार्यालयातील सर्वच कर्मचारी काम न करता कार्यालयीन कागदपत्रे सांभाळण्याच्या कामात व्यस्त झाले होते. त्यामुळे टेबलवर कागदपत्रांचे गठ्ठे मांडण्यात कर्मचारी सक्रीय दिसत होते.