मोहाडी येथे वृक्षरथयात्रेचे स्वागत

By Admin | Updated: May 12, 2017 01:59 IST2017-05-12T01:59:02+5:302017-05-12T01:59:02+5:30

हरीत क्रांतीचे उद्देश घेवून जनतेत जनजागृती करण्यासाठी निघालेली स्वागत तहसिल कार्यालय मोहाडी येथे करण्यात आले

Welcoming the Treeline at Mohali | मोहाडी येथे वृक्षरथयात्रेचे स्वागत

मोहाडी येथे वृक्षरथयात्रेचे स्वागत

हरित क्रांतीचा उद्देश : वनविभागाची ‘चांदा ते बांदा’ यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : हरीत क्रांतीचे उद्देश घेवून जनतेत जनजागृती करण्यासाठी निघालेली स्वागत तहसिल कार्यालय मोहाडी येथे करण्यात आले व पुढील प्रवासाकरीता या चित्ररथ यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. येत्या १ ते ५ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून मोहाडी तालुक्यात १ लक्ष १३ हजार वृक्षाची लागवड करण्याचा उद्येशोक देण्यात आला आहे. याप्रसंगी तहसिलदार धनंजय देशमुख, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव आगार पी.जी. कोडापे, वनक्षेत्र अधिकारी देवेंद्र चकोले, क्षेत्रसहायक वाय.ए. बावनथडे, वनरक्षक आर.एस. हुलकाने, पी.डी. माटे, आ.टी. पाटे, आर.टी. मेश्राम, ए.पी. झंझाड, आर.एम. कानसकर, एच.एम. जायभये, प्रदीप गोळीवार, यादोराव बावनथडे, उज्वला बागडे, रामकृष्ण मेश्राम, अजय उपाध्ये, राहुल हुलकाने, एफ.जे. आजमी, प्रशांत गजभिये, मनोहर धकाते, रविंद्र कांबळे, दिनेश फटींग, हेमंत बांगडकर, हुसेन खाँ पठाण आदी कांद्री व तोंडेझरी वनक्षेत्रातील वन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडापे यांनी केले. संचालन जायभाई यांनी तर आभार गंधारे यांनी मानले.

Web Title: Welcoming the Treeline at Mohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.