नवीन व मावळते जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
By Admin | Updated: July 2, 2016 00:34 IST2016-07-02T00:34:39+5:302016-07-02T00:34:39+5:30
नवव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

नवीन व मावळते जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
कास्ट्राईब महासंघाचे पुढाकार : संघटनेच्या सहकार्यासाठी तत्पर राहणार
भंडारा : नवव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
धीरजकुमार हे कर्तव्यदक्ष, मनमिळावू जिल्ह्यातील विकासाची कामे, दोन महिला शासकीय वसतीगृह, सुशिक्षित मुला-मुलींकरीता युपीएस, एमपीएस, बँकींग, लायब्ररी सामाजिक न्याय भवन, भंडरा येथे सुरू करण्यात आले. तसेच कलेक्टर चौक सौदर्यीकरण आणि भंडारा जिल्ह्यातील रस्ते दुरूस्त करण्याचे काम अवघ्या १ वर्षाच्या कमी कालावधीमध्ये अती उत्कृष्ठ काम केलेले आहे.
ग्रामीण मधून येणारे शेतमजून, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कर्मचारी संघटनेचे असे अनेक प्रश्न त्वरीत सोडविणारे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त, पुणे येथे पदोन्नती होवून जात असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नुतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना संघटनेकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. संघटनेचे सहकार्य नेहमी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सूर्यकांत हुमणे, उपमहासचिव महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, उपाध्यक्ष मधुकर रूसेकर, डॉ. मधुकर रंगारी, जिल्हा संघटक हेमंत भांडारकर, उपाध्यक्ष हंसराज शहारे, विभागीय सहसचिव यशवंत उईके, सचिव मनिष वहाने, सदस्य अजय रामटेके, जिल्हा महिला प्रतिनिधी नलिनी देशभ्रतार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)