प्रवाशांचे ‘फूल’ देऊन होणार स्वागत

By Admin | Updated: June 1, 2015 01:07 IST2015-06-01T01:07:57+5:302015-06-01T01:07:57+5:30

सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जून ला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत.

Welcome to give travelers 'flowers' | प्रवाशांचे ‘फूल’ देऊन होणार स्वागत

प्रवाशांचे ‘फूल’ देऊन होणार स्वागत

शिवशंकर बावनकुळे साकोली
सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जून ला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने होणाऱ्या परिवहन दिनासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आपल्या आगारामध्ये विविध उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. जेणे करून या दिवसाचे आगळेवेगळे स्वरुप प्रवाशांना जाणवले पाहिजे.
परिवहन दिनाचे औचित्यसाधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाड्या आतून आणि बाहेरून साफ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटेल. त्याचप्रमाणे एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभीत करण्यात येणार आहेत. याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे स्वागत करण्यात येईल. वर्धापन दिन हा परिवहन दिन म्हणून साजरा करण्याबाबत सर्व आगारांना याचे परिपत्रक पाठविण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर काही महिन्यातच अहमदनगर पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा केल जातो. मात्र गेल्या वर्षीपासून हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा एसटी महामंडळाने सुरु केली.या दिवशी एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन अनेक कार्यक्रम आखले आहेत. महामंडळाच्या राज्यभरातील २५० आगारामध्ये हे कार्यक्रम दिवसभर होतील. आगारात उत्तम कामगिरी करणारे चालक, वाहक यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही सत्कार प्रत्येक आगारात करण्यात येईल. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

Web Title: Welcome to give travelers 'flowers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.