कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

By Admin | Updated: June 27, 2017 00:28 IST2017-06-27T00:28:26+5:302017-06-27T00:28:26+5:30

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींच्या ...

Welcome from the debt waiver decision | कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा लाभ देऊन ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. या कर्जमाफीचा भंडारा जिल्ह्यातील २६ हजार८२५ शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यांच्या १४५ कोटी ८५ लाख रूपयांची कर्जमाफी होणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करून गांधी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नगरसेवक संजय कुंभलकर, आशिष गोंडाणे, नितीन धकाते, मंगेश वंजारी यांच्यासह भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Welcome from the debt waiver decision