भारनियमन: धान पिके लागली करपायला
By Admin | Updated: September 29, 2014 23:00 IST2014-09-29T23:00:22+5:302014-09-29T23:00:22+5:30
विद्युत महामंळाकडून जांब परिसरात कृषी पंपाच्या लाईनचा दिवसातून १६ तासाचा भारनियमन होत असल्याने धान पिकाला पाणी वेळेवर मिळत नसल्याने जांब, लोहारा परिसरातील धान पिके

भारनियमन: धान पिके लागली करपायला
जांब (लोहारा) : विद्युत महामंळाकडून जांब परिसरात कृषी पंपाच्या लाईनचा दिवसातून १६ तासाचा भारनियमन होत असल्याने धान पिकाला पाणी वेळेवर मिळत नसल्याने जांब, लोहारा परिसरातील धान पिके करपू लागले आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडले असून शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे.
जांब, लोहारा परिसरातील धान पिके गर्भाअवस्थेत आहे. यावेळी धान पिकाला भरपूर पाण्याची गरज असते. पावसाने डोळे वटाळले असले तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरी, बोळ्या, नाले, तलाव या ठिकाणी पाणी साचलेला आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाने, करपत असलेल्या धान पिकाला पंपाने पाणी देणे सुरू आहे. पण विद्युत महामंडळाकडून दिवसातून फक्त ८ तास विद्युत पुरवठा सुरू ठेवतात बाकीचे १६ तास कृषी पंपाचा भारनियमन करित असल्याने ८ तासामध्ये धान पिकाला पाणी देवून धान पिके वाचविता येत नाही व शेतकऱ्याकडे पाणी असूनही धान पिक करपू लागले असल्याने शेतकरी संकटात आहेत. हातात आलेले धान पिक जाणार असल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. संबंधित शाखा अभियंता यांच्याशी शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या भारनियमना संदर्भात चर्चा केली असता वरिष्ठस्तरावरूनच भारनियमन करण्याचे आदेश असून तो कमी करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे सुद्धा संबंधित अभियंत्याकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. कृषी पंपाचे भारनियमन बंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)