लग्नाचे निमंत्रण आता व्हाॅट्सॲपवरूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:38+5:302021-03-31T04:35:38+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विवाह सोहळ्यात केवळ ५० लोकांनाच परवानगी दिलेली आहे. हा आदेश अद्यापही लागू आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची ...

Wedding invitations now from WhatsApp | लग्नाचे निमंत्रण आता व्हाॅट्सॲपवरूनच

लग्नाचे निमंत्रण आता व्हाॅट्सॲपवरूनच

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विवाह सोहळ्यात केवळ ५० लोकांनाच परवानगी दिलेली आहे. हा आदेश अद्यापही लागू आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. लग्नपत्रिकासोबतच कॅटरर्स, सभागृह, रोषणाई, ध्वनिक्षेपक आदी व्यवसायांनाही मोठा फटका बसलेला आहे. तसेच वेडिंग इव्हेंट करणारेही अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यामुळे अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आले होते. मध्यंतरी कोरोनाचा लाट थांबली असताना काहीसा व्यवसाय सुरळीत चालू झाला होता. त्यासाठी व्यवसायाची व्याप्ती वाढवायची म्हणून आम्ही नव्या मशीन खरेदी केल्या आणि त्यानंतर राज्यात पुन्हा कोरोनाची लाट पसरली आणि छपाई व्यवसायावर मोठा परिणाम झाला. तसेच कोरोनामुळे लग्न सोहळ्यात फक्त ५० लोकांनाच परवानगी दिली जात असल्याने लग्नपत्रिका छापण्याकडे कल कमी झाला आहे. ५० पत्रिका छापणे परवडत नाही. त्यामुळे लग्नाचे निमंत्रण सोशल मीडियावरून दिले जात असल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे.

Web Title: Wedding invitations now from WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.