शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:26 IST

मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते.

ठळक मुद्देनाना पटोले : आदिवासी हलबा हलबी समाजाचा विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. कमी खर्चात व अल्पवेळात सामुहिक विवाह सोहळा आदर्श समाज घडवून आणतो. सामुहिक विवाह सोहळा समाज एकत्र आणण्याचे काम करतो, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.गोरेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजित आदिवासी हलबा/हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आदिवासी संघटनेचे डॉ. नामदेवराव किरसान व त्यांच्या समितीच्या आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात २० जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आदिलोक युवा मंचतर्फे भारतीय संविधान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या समाजात सेवा करण्याचे काम व लोकांना शुद्ध पाणी मिळावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे व अपेक्षेच्या दृष्टीने पाणी देण्याचे काम प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मालिकचंद मेळे यांनी केले.या कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी आ. हेमंत पटले, केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, उषा मेंढे, शिवलाल गावड, विजय राणे, अमर वºहाडे, किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार,मनोहर चंद्रिकापुरे, गोरेगावच्या नगराध्यक्ष सीमा कटरे, न.प.उपाध्यक्ष आशिष बारेवार, विरेंद्र जायस्वाल, जगदीश येरोला, सभापती मलेशाम येरोला, जे.टी. दिहारी, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, देवराज वडगाये, हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य केवल बघेले, पी.पी. कोरोंडे, यु.जी. फरदे, एस.आर. चनाप, माजी तहसीलदार खुशाल खुटमुडे, उपमुख्याधिकारी सी.ए. राणे, एन.एम. किरसान, हौसलाल रहांगडाले, सी.आर. भंडारी, एम.बी. दमाहे, तुलाराम मारगाये, रामू औरासे, महेंद्र दिहारे, विनोद उके, मधुकर किरसान उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. नामदेवराव किरसान, रामचंद्र फरदे, अजय कोटेवार, एच.बी. राऊत, वाय.सी. भोवर, मुलचंद खांडवाये, एस.सी. भोयर, विरेंद्र चाकाटे, सूरज कोल्हारे, प्रभूदयाल मसे, विजय कोटेवार, बी.एस. वडेगावकर, सुभाष चुलपार, टी.एम. बिसेन, कारु फरदे, भरत घासले आदींनी सहकार्य केले.