शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून गावोगावी वाचनालये उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:46+5:302021-04-02T04:36:46+5:30

: सीतासावंगी येथे वाचनालयाचे उद्घाटन ०१ लोक ०७ के तुमसर : विज्ञानयुगात माणसाने कितीही प्रगती केली असली तरी, वाचन ...

We will set up village libraries through educational movement | शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून गावोगावी वाचनालये उभारू

शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून गावोगावी वाचनालये उभारू

: सीतासावंगी येथे वाचनालयाचे उद्घाटन

०१ लोक ०७ के

तुमसर : विज्ञानयुगात माणसाने कितीही प्रगती केली असली तरी, वाचन व संस्काराशिवाय जीवन सुसंस्कारित होऊ शकत नाही. त्यामुळे खेड्यापाड्यात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून गावोगावी वाचनालये उभारणार असल्याचा विश्वास गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील सीतासावंगी येथे सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चिखला मॉयलचे व्यवस्थापक चौकशे, खान अधिकारी सिंगाडे, मेश्राम, सरपंच नीलिमा गाढवे, प्रभारी सरपंच गायगवाल, ग्रामविकास अधिकारी अविनाश गजबे मंचकावर उपस्थित होते. ठाणेदार दीपक पाटील यांनी वाचनालयाचे महत्त्व पटवून दिले. सदर वाचनालयाला लागणारी पुस्तके भेट दिले. भविष्यात अजून जास्त प्रमाणात पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत गोबरवाही येथे ठाणेदार म्हणून कार्यरत राहणार तोपर्यंत परिसरात शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून गावोगावी वाचनालय उभे करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेश्राम यांनी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार व वाचनालय निर्मितीचा प्रवास कथन केला. विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तकाचे महत्त्व सांगून वाचनालयाने ती गरज पूर्ण होणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. खाण मॅनेजर चॉकसे यांनी वाचनालयाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले तर खाण अधिकारी सिंगाडे यांनी डॉ.आंबेडकर लिखित पुस्तके भेट दिली.

वाचनालय निर्मिती व कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुंज फौंडेशन व प्रभारी सरपंच गायगवाल यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळण्यात आले.

Web Title: We will set up village libraries through educational movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.