‘आम्ही दंड भरणार नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:14 IST2017-08-05T00:14:31+5:302017-08-05T00:14:49+5:30
‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत.

‘आम्ही दंड भरणार नाही’
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत. तलावातील गौण खनिजाची परस्पर विक्री केल्याचा ठपका ठेवून ग्रामपंचायतवर सुमारे २ कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड ‘आम्ही भरणार नाही’ असा निर्धार सरपंच शारदा गायधने केला आहे.
गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राष्टÑीय महामार्गावरील बेला ग्रामपंचायत हद्दीतील लघु पाटबंधारे विभागाच्या मामा तालावातील गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात आला. कामाचे भूमिपूजन विभागीय आयुक्त अनुपकूमार यांच्या हस्ते केले. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, भंडारा पंचायत समितीच्या संवर्ग अधिकारी मंजुषा ठवकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकसहभागातून केलेल्या कामाला ग्रामस्थांना सहभाग मिळाला. दरम्यान तलावातून मुरुम उत्खनन करुन लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप काही पदाधिकाºयांनी व संघटनेने केला आहे. दरम्यान याची चौकशी करण्यात आली. यात ग्रामपंचायत प्रशासनाला दोषी पकडून सुमारे दोन कोटींचा दंड आकारला आहे.
प्रशासनाने ठोठावलेला हा दंड ग्रामपंचायतवर अन्यायकारक आहे. जर ग्रामपंचायत यात दोषी असल्यास अधिकारीही यात तेवढेच दोषी असल्याचा आरोप यावेळी सरपंच गायधने यांनी केला. तलावातील गाळ दिवसाढवळ्या काढला. महसूल विभागाने मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी. अधिकाºयांच्या निर्देशानुसार काम झाले आहे. त्यामुळे ‘आम्ही दंड भरणार नाही’ असा निर्धार पत्रपरिषदेत गायधने यांनी व्यक्त केला.
पत्रपरिषदेला सरपंच अर्चना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रजनी बाभरे, धनराज घरडे, संजय भीवगडे, पुनाजी सपाटे, प्रकाश लानगे, अल्का बोरकर, शिला भिवगडे, हिरकना भिवगडे, पंचफुला मेश्राम, धनराज गाढवे, सुनिल टांगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.