कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:56+5:30

गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला. विविध औषधीमध्ये कोरफडचा उपयोग केला जातो. आता तर प्रक्रिया उद्योगातही उतरला आहे.

The way of progress made by the farmer discovered from aloe farming | कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग

कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग

Next
ठळक मुद्देरोहणी येथील शेतकरी : प्रक्रीया लघु उद्योगातून ग्रामीण तरुणांना दिला हक्काचा रोजगार

दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : परंपरागत धान शेतीला बगल देत एका शेतकºयाने औषधीयुक्त कोरफड लागवडीतून प्रगतीचा मार्ग शोधला. एवढेच नाही तर प्रक्रिया लघु उद्योगातून परिसरातील तरुणांना आत्मनिर्भर करण्याचे धाडस दाखवत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. धान पट्ट्यात वेगळी वाट चोखाळणारा हा शेतकरी आहे, तालुक्यातील रोहणी येथील खेमराज हरिचंद्र भुते आज त्याच्या शेतातील उत्पादनांना चांगली मागणी आहे.
कोरफड अर्थात अलोविरा ही वनस्पती औषधी गुणांनी युक्त आहे. या कोरफड वनस्पतीची लागवड खेमराजने आपल्या शेतात केली. खेमराज हा औषध निर्माण शास्त्रात पद्व्यूत्तर शिक्षण घेतलेला तरुण आहे. गोवातील एका नामवंत कंपनीत औषध निर्माता म्हणून नोकरीही केली. मात्र त्याच्यातील उद्योजक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो थेट रोहणी गावात पोहोचला. गावातील आपल्या शेतात कोरफड या औषधी वनस्पतीची लागवड केली.
गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला. विविध औषधीमध्ये कोरफडचा उपयोग केला जातो. आता तर प्रक्रिया उद्योगातही उतरला आहे. त्याचा हा प्रयोग आता यशस्वी होत असून त्याच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी आणि कोरफड लागवडीची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी त्याच्या शेतावर जातात. अनेकांनी आपल्या शेतात लागवड करण्याचा संकल्प केला आहे.

देश-विदेशात उत्पादनाची मागणी
औषधी गुणांनी युक्त कोरफडला देश-विदेशात मोठी मागणी आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील धान पट्यातील शेतकऱ्यांना याबाबतची माहिती पुरेशी नव्हती. मात्र आता खेमराजने धाडस करुन प्रक्रिया उद्योग सुरु केला. सौंदर्य प्रसाधने व औषधी द्रव्यात त्याचा उपयोग केला जातो. घृतीका अ‍ॅग्रो नामक लघु उद्योगाच्या माध्यमातून आपले उत्पादन देशविदेशात पोहोचवत आहे. एका शेतकºयाने धाडस दाखवून आपल्या मायभूमीतील बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली. जिल्ह्यात अनेक शेतकरी धानाचे उत्पन्न घेत शेती परवडत नसल्याची ओरड करीत आहेत. मात्र पीक पद्धतीत बदल केल्यास शेतीव्यवसाय आजही फायदेशिर ठरत आहे. यासाठी गरज आहे ती फक्त आधुनिक तंत्रज्ञानासह पीक पद्धतीत बदल करण्याची.

Web Title: The way of progress made by the farmer discovered from aloe farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.