शेतकऱ्यांचा मदतनिधी परत जाण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: March 8, 2015 00:25 IST2015-03-08T00:25:31+5:302015-03-08T00:25:31+5:30
शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली मदत निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्यांचा मदतनिधी परत जाण्याच्या मार्गावर
मोहाडी : शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली मदत निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. याबाबत वारंवार सूचना देवूनही लाभार्थी शेतकऱ्यांनी खातेक्रमांक न दिल्याने निधी पडून आहे. पर्यायाने निधी शासनकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे.
मोहाडी तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत ३,५७७ व खरीप हंगाम २०१४ तील ८४१ असे ४,४१८ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले बँक खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्याने शासकीय अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आली नाही. याबाबत दैनिक लोकमत वृत्तपत्रात २८ फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असूनसुद्धा अजूनपर्यंत उपरोक्त शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी खाते क्रमांक दिले त्यांना मदतनिधी वाटप सुरु आहे. जून ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधीत ३५७७ शेतकरी व खरीप २०१४ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत खाते क्रमांक व संमतीपत्र संबंधित तलाठ्याकडे दिलेले नाहीत. यामुळे मदतनिधी वाटपात विलंब होत आहे. ७ मार्च पर्यंत बँक खाते क्रमांक संबंधित तलाठ्याकडे जमा करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते अप्राप्त आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्वरीत खातेक्रमांक द्यावे, असे आवाहन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)