लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वीज विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे खराशी व लोहारा चे पाणी पुरवठ्याची वीज चार दिवसापासून खंडित झाल्याने दोन्ही गावात पाणी टंचाई सदृश्य स्थिती तयार झाल्याने गावात आक्रोश व्यक्त होत आहे .खराशी, लोहारा, पाथरी परिसरात विज विभागाचे मागील दोन महिन्यापासून दुर्लक्ष झाल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.संबंधित वीज कर्मचारी भ्रमणध्वनी ला प्रतिसाद देत नसल्याने न्याय मागायचा कुणाला आणि तक्रार करायची कुठे असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलेला आहे.घरगुती ग्राहकांना सुद्धा वेळेत खंडित झालेली वीज दुरुस्त करून मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेला २४ तास वीज पुरवठा चे धोरण असताना खराशी ग्रामपंचायती ने वारंवार चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करूनही वीज पुरवठा होत नसल्याने गावाला अपेक्षित पाणीपुरवठा पुरवू शकत नाही. याची दखल वीजपुरवठा ने व लोकप्रतिनिधींनी घेत खराशी गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश झलके यांनी लोकमत प्रतिनिधीकडे करीत उपकार्यकारी अभियंता लाखणी यांच्याकडे निवेदन देत न्यायाची अपेक्षा केली आहे.खराशी ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठ्याची वीज काल रात्रीच्या वादळामुळे खंडित झालेली आहे. दुपारी कंत्राटदाराची माणसं सोबत घेत त्वरित वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.- मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूरखराशी पाणीपुरवठ्याची खंडित झालेली वीज तत्काळ दुरुस्त करून देण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्याशी चर्चा केलेली आहे. ते स्वत: मजुरां सोबत खराशी येथील पाणीपुरवठा च्या लाईनवर काम करीत आहेत. लवकरच विजेचा प्रश्नच दूर होऊन वीज सुरळीत केली जाईल.- आर. एम. लिमजे, उपकार्यकारी अभियंता, लाखनी
दोन गावातील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST
भंडारा जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेला २४ तास वीज पुरवठा चे धोरण असताना खराशी ग्रामपंचायती ने वारंवार चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करूनही वीज पुरवठा होत नसल्याने गावाला अपेक्षित पाणीपुरवठा पुरवू शकत नाही. याची दखल वीजपुरवठा ने व लोकप्रतिनिधींनी घेत खराशी गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश झलके यांनी लोकमत प्रतिनिधीकडे करीत उपकार्यकारी अभियंता लाखणी यांच्याकडे निवेदन देत न्यायाची अपेक्षा केली आहे.
दोन गावातील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित
ठळक मुद्देगावात पाण्यासाठी जनतेचा आक्रोश : वीज विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, खराशी व लोहारा येथील प्रकार