तीन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद!
By Admin | Updated: February 1, 2016 02:28 IST2016-02-01T02:28:44+5:302016-02-01T02:28:44+5:30
दाब वाढल्याने खडकीजवळ फुटली जलवाहिनी

तीन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद!
अकोला: शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली. दाब वाढल्यामुळे खडकीजवळ जलवाहिनीचा जोड रविवारी निखळला. त्यामुळे तीन दिवसांसाठी अकोलेकरांचा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरापर्यंत येणारी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहे. गत महिन्याभरात तिसर्यांदा जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला. दाब वाढल्याने रविवारी खडकी येथे तुळजा भवानी हॉटेलजवळ जलवाहिनीचा जोड निखळला. ९00 एम.एम. व्यासाची मुख्य वाहिनी फुटल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. येथे दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी दिली