पालांदुरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:52+5:30

लाखनी तालुक्यात पालांदूर सर्वात मोठे गाव. व्यापार सुध्दा मोठाच. दररोजच लहान-मोठे ट्रक, मोठी लॉरी यासारखे वाहन बायपासऐवजी मुख्य एकमेव गावातील रस्त्याने वाहतूक करतात. अरुंद रस्त्यात दोन मोठी वाहने एकमेकांना ओलंडताना पाईप लाईनला समस्या येते. नवीन वाहनधारकाला या पाईपलाईनची किंवा व्हॉल्वची जाणीव नसते. नेमके हेच होत जिल्हा परिषद सदस्य बिंदू कोचे यांच्या घरासमोरील पाईपलाईनचा कठडा ट्रकने तोडला.

Water supply jam for three days at Palandur | पालांदुरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

पालांदुरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देजड वाहतुकीने पाईप फुटले : बायपास मार्ग आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : जड वाहतुकीने गावातील नळ पाईपलाईन फुटली. यात पाईपलाईनसह व्हॉल्वचे नुकसान झाल्याने दुरुस्तीला वेळ लागला. त्यामुळे घराघरात पोहचणारी पाणी व्यवस्था कोलमडली. तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने महिलांचा आक्रोश वाढला आहे.
लाखनी तालुक्यात पालांदूर सर्वात मोठे गाव. व्यापार सुध्दा मोठाच. दररोजच लहान-मोठे ट्रक, मोठी लॉरी यासारखे वाहन बायपासऐवजी मुख्य एकमेव गावातील रस्त्याने वाहतूक करतात. अरुंद रस्त्यात दोन मोठी वाहने एकमेकांना ओलंडताना पाईप लाईनला समस्या येते. नवीन वाहनधारकाला या पाईपलाईनची किंवा व्हॉल्वची जाणीव नसते. नेमके हेच होत जिल्हा परिषद सदस्य बिंदू कोचे यांच्या घरासमोरील पाईपलाईनचा कठडा ट्रकने तोडला. त्यामुळे अख्खी पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावित झाली. गत तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने घराघरात बायपासची चर्चा जोर धरीत आहे.
पालांदूर बायपास अंतीम टप्प्यात आहे. ग्रामपंचायतमध्ये जाहिरनामा प्रकाशित झाला आहे. उपविभागीय अधिकारी साकोली व बांधकाम विभाग साकोली यांनी त्वरित प्रक्रिया राबवित पालांदूर बायपास पावसाळापूर्वी करावा, अशी मागणी पालांदूरवासीयांनी केली आहे.

जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया थंडबस्त्यात
पालांदूर बायपास रस्त्याच्या अनुषंगाने एक कोटी ३७ लाख रुपये मंजूर असल्याने कामाला गती द्यावी, प्रभावित शेतकऱ्यांना वास्तविकतेच्या आधारावर न्याय देत जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकर राबविण्यास बायपासला लवकर मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक वर्षापासून प्रश्न मार्गी लागत नसल्याने समस्या वाढत आहेत.

गावकऱ्यांना एकच मार्ग आहे. यातूनच व्यापारसुध्दा चालतो. मोठे ट्रक गावाबाहेरच थांबवले तर व्यापार प्रभावित होतो. प्रसंगी व्यापारी अडचणीत येतील. सर्वच वाहतूक समस्यांवर बायपास रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. तो त्वरीत झाला पाहिजे.
-हेमराज कापसे, उपसरपंच, पालांदूर
शक्य तितक्या लवकर नळयोजना दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. किचकट व अडचणीतले काम असल्याने विलंब लागत आहे. शक्यतो उद्याला पाणी घराघरात पोहचू शकते.
-धनराज बावनकुळे, ग्रामविकास अधिकारी, पालांदूर

Web Title: Water supply jam for three days at Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.