मंडळ कृषी कार्यालयात पाणीच पाणी

By Admin | Updated: August 28, 2014 23:35 IST2014-08-28T23:35:17+5:302014-08-28T23:35:17+5:30

तुमसर तालुक्यात ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ कृषी कार्यालयाची अजब कथा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कार्यालय वांझोटा ठरत

Water supply to the Agriculture Office | मंडळ कृषी कार्यालयात पाणीच पाणी

मंडळ कृषी कार्यालयात पाणीच पाणी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड
तुमसर तालुक्यात ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ कृषी कार्यालयाची अजब कथा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कार्यालय वांझोटा ठरत असल्याची प्रचिती अनुभवास येत आहे. पावसाळ्यात या कार्यालयात पाणीच पाणी असल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात मंडळ कृषी कार्यालयाची स्थाना करण्यात आलेली आहे. सिहोरा गावाच्या नावाने असलेला हा कार्यालय ८ कि़मी. अंतरावरील हरदोली गावातून प्रशासकीय कारभार करीत आहे. या कार्यालय अंतर्गत बपेरा, देवसर्रा, टेमणी, चुल्हाड, देव्हाडी आदी गावाचे कृषी सहायकाचे पदे आहेत.
यात अनेक पदे रिक्त आहेत. बपेरा गावाला हाजवर कृषी सहायक प्राप्त झाले नाही. यामुळे प्रभारावर प्रशासकीय कारभार होत आहे. या मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत सर्वाधिक पुरग्रस्त गावे आहेत. गावात पुराचे पाणी शिरत आहे. यामुळे शेतीची कल्पना करता येते. दरवर्षी पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान होत आहे. नदी पात्रात शेकडो हेक्टर शेतीचे भुस्खलन झाले आहे. एकट्या बपेरा गावात ८७ हेक्टर आर शेती नदी पात्रात आहे. परंतु सर्वेक्षण तथा शासकीय मदत देणारा कृषी विभाग मात्र लंगडा आहे.
राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या कार्यालयाचा प्रशासकीय कारभार आधी सिहोरा गावातून करण्यात येत होता. भाड्याच्या खोलीतून होणाऱ्या प्रशासकीय कारभाराने कार्यरत कर्मचारी तथा शेतकरी सुखावले होते. परंतु या कार्यालयाचे हरदोली गावात स्थानांतरण होताच कर्मचारी आणि शेतकरी आतंक अनुभवत आहेत. प्रशासकीय कारभार करणारी शासकीय इमारत जिर्ण झाली आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत कोसळत आहे. कार्यालयात पाणी साचत असल्याने महत्वपूर्ण दस्तऐवज पावसाला बडी पडत आहेत. कर्मचाऱ्याच्या खुर्च्या आणि टेबल, पावसाच्या पाण्याने ओलेचिंब होत आहे. पाऊस सुरू होताच कार्यरत कर्मचारी कार्यालय सोडून पानटपरीचा आश्रय घेत आहेत. इमारत कोसळण्याची भिती कार्यरत कर्मचाऱ्यांना आहे. या कार्यालयात जागे अभावी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे.
कार्यालयाच्या अवस्थेला कर्मचारी दोषी नसताना ही शेतकरी असंतोषाचे खापर फोडत आहेत. या कार्यालयाचे सिहोरा गावात स्थानांतरण करण्याची ओरड आहे. परंतु कृषी विभाग गंभीर नाही. बस स्थानक परिसरात जि.प. विभागाची सुसज्ज इमारत रिक्त आहे. ही इमारत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या कार्यालयाला देण्याची जुनी मागणी आहे. दरम्यान राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या लघु पाठबंधारे विभागाची वसाहत रिकामी आहे. या विभागात कार्यरत कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी वास्तव्य करीत नाही. या वसाहतीच्या रिकाम्या खोल्या कृषी कार्यालयाला प्रशासकीय कारभारासाठी देण्यात अडचण नाही. दोन्ही विभाग राज्य शासनाची आहेत. जिल्ह्यात दोन्ही विभागाचे जिल्हा कार्यालय आहेत.

Web Title: Water supply to the Agriculture Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.