तुमसर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट
By Admin | Updated: April 10, 2015 00:43 IST2015-04-10T00:43:15+5:302015-04-10T00:43:15+5:30
तालुक्यातील सिहोरा परिसरातील धरणात पाणी असतांना नियोजन शुन्यते मुळे गावात एप्रिल महिन्यात भिषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.

तुमसर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट
तुमसर / चुल्हाड : तालुक्यातील सिहोरा परिसरातील धरणात पाणी असतांना नियोजन शुन्यते मुळे गावात एप्रिल महिन्यात भिषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पाण्याअभावी नळ योजना अडचणीत आलेल्या आहेत. मंजुरीच्या वादात धापेवाडा तथा बावनथडी धरणाचे गेट अद्याप उघडण्यात आले नाही.
तुमसर तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्या आहेत. या नद्यांच्या काठावर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजना आहेत. एप्रिल महिण्यात नियोजन शुन्यतेमुळे नळ योजना वांझोट्या ठरत आहेत. बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प असून नळ योजनांचे पंपगृह आहेत. पंरतु नदी पात्रात पाणीच नसल्याने नळ योजना कोरड्या पडल्या आहेत.
याच नदीवर राजीव सागर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणात पाणी आहे. यात असलेले पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडे नाही. शेतकरी तथा जनतेची तहान भागविण्यासाठी धरणात अडविण्यात आलेले पानी उपयोगात येत नाही. असे चित्र निर्माण झाले आहे. नदी काठावर वास्तव्य असणाऱ्या गावात शेतकऱ्यांचे जनावरे पाण्यासाठी भटकत आहेत. या गावात असणाऱ्या तलाव बोडी पुर्णत: आटलेल्या आहेत. विहिरीची पातळी खोलवर गेल्याने पाण्यासाठी वणवा सुरु झाला आहे.
बावनथडी नदी काठाच्या दोन्ही काठावरील ६० गावे नदी पात्रात पाणी नसल्याने अडचणीत आली आहेत. यामुळे राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प आणि अदान विज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी ४५० शेती खर्चुन धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. पंरतु उर्ध्व भागाकडे पाणी नाही. या धरणाचे गट उघडण्यात आले नाही. तिरोडा उपसा सिचंन योजना तिरोडाचे नियोजन शुन्यतेमुळे ८ गावात नळ योजनांना पाणी मिळत नाही. तुमसर तालुक्याच्या दिशेने असणारा धरणाचा दरवाजा अद्याप उघडण्यात आलेला नाही. यामुळे सिहोराला पाणी पुरवठा करणारी नळ योजना अडचणीत आली आहे. १४ हजार नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
गावागावात कुत्रिम पाणी टंचाईची झळ पोहचत असतांना यंत्रणा मंजुरी घेण्याचे तुणतुने हलवित आहे. पंरतु या यंत्रणेमार्फत अद्याप पुढाकार घण्ेयात आलेला नाही. सिहोरा परिसराच्या दिशेने असणारे धरणाचे गट तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य बंटी बानेवार, सरपंच नेहा कुंभारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)