जलसंपदामंत्र्यांनी घेतला अधिकारी, कार्यकर्त्यांचा क्लास

By Admin | Updated: January 28, 2015 23:09 IST2015-01-28T23:09:46+5:302015-01-28T23:09:46+5:30

बावनथडी प्रकल्प व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची सद्यस्थिती, रखडलेली कामे, पुर्णत्वास येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेऊन तुमसर विधानसभा मतदारसंघात

The water resources minister, the workers' staff | जलसंपदामंत्र्यांनी घेतला अधिकारी, कार्यकर्त्यांचा क्लास

जलसंपदामंत्र्यांनी घेतला अधिकारी, कार्यकर्त्यांचा क्लास

तुमसर : बावनथडी प्रकल्प व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची सद्यस्थिती, रखडलेली कामे, पुर्णत्वास येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेऊन तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पराभवासह पक्ष संघटनेसंदर्भात अडीच तासांचा क्लास राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी घेतला.
यावेळी त्यांनी बावनथडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता निशिकांत पनके तथा इतर अधिकाऱ्यांनी सिंचन क्षमता, रखडलेली कामे, मूळ किंमत व सध्याची किमतीची माहिती घेतली, जलक्षमता किती आहे, या प्रश्नाच्या उत्तरावर अधिकारी चांगलेच गोंधळले. त्यानंतर प्रकल्पाची सविस्तर माहिती ठेवा, असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.
जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता बॅनर्जी यांनी चांदपूर, बघेडा, आंबागड, कारली या प्रकल्पासह रबी व खरीप पीक सिंचन क्षेत्राची माहिती दिली.
तुमसरचे तहसीलदार सचिन यादव यांनी नऊ गावात पाणी टंचाई असल्याचे सांगितले.
त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत काही वेळ विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, शहरातील पक्षसंघटना, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांची संख्या, लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जातीनिहाय मतदारांची संख्या किती? पुढे कोण निवडणूक लढणार आहे. मागील २० वर्षापूर्वी कोण आमदार होते, याची सविस्तर माहिती लिहून घेतली.
पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.विजय शिवतारे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी माजी आ.नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, जिल्हाउपप्रमुख प्रशांत लांजेवार, राजेंद्र पटले, लालू हिसारिया, सुधाकर कारेमोरे, प्र्रकाश पारधी, शेखर कोतपल्लीवार, मेहताब सिंग ठाकूर, संतोष पाठक, रमन खोब्रागडे, बालू मदनकर, मदन इलमे, मोहने, साहेबराव पारधी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक किशोर गवई, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, महेंद्र सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी दौलत गभणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The water resources minister, the workers' staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.