शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला की बुडीत आणि लाभक्षेत्रातील वैनगंगा नदीतीरांवरील गावांना महापुराचा धोका असतो. नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग झाला नाही तर महापुरात कोट्यवधी रुपयांची हानी होते. दहा प्रकल्प आणि चार नद्यांचे पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात येत असल्याने नियोजन करताना मोठी तारांबळ उडते. त्यातच समन्वयाचा अभाव असला की गतवर्षीसारखी भीषण स्थिती निर्माण होते.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.गतवर्षी महापुराला हेच कारण महत्त्वाचे ठरले. संजय सरोवरासह सर्व दहा प्रकल्पांतील पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात जमा झाले. त्यामुळे बॅकवाॅटरमध्ये असलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना पुराचा फटका बसला. गोसेखुर्दचे ३३ दरवाजे सतत सात दिवस गतवर्षी उघडावे लागल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यँत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा प्रशासनाने समन्वयाच्या माध्यमातून पाणी नियंत्रणावर भर दिला आहे. सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एकमेकांच्या संपर्कात आहेत.

पुजारीटोलाचे १२ गेट उघडले- गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट ०.३० मीटरने उघडण्यात आले असून २८६.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे सर्व पाणी वैनगंगेच्या माध्यमातून गोसेखुर्द प्रकल्पातच येणार आहे. पुजारीटोलापासून पाणी येण्यासाठी ३२ तासांचा अवधी लागणार आहे. यामुळे नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संजय सरोवराचे पाणी आज पोहोचणार कारधात  - मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्प गुरुवारी ९४ टक्के भरल्याने त्याचे तीन गेट उघडण्यात आले होते. दोन गेट अर्धा मीटरने, तर एक गेट एक मीटरने उघडण्यात आले. २९४.५० क्युसेक पाण्याचा विसर्ग गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आला. सतत नऊ तास पाण्याचा विसर्ग झाला. या प्रकल्पातून सोडलेले पाणी भंडारालगतच्या कारधा येथे वैनगंगा नदीत येण्यासाठी ३९ तास लागतात. साधारणत: शनिवारी या प्रकल्पाचे पाणी पोहोचणार आहे. गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ होणार असून पाणीविसर्गासाठी नियोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पDamधरण