जानेवारी महिन्यापासून मिळणार निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी

By Admin | Updated: October 28, 2016 00:27 IST2016-10-28T00:27:56+5:302016-10-28T00:27:56+5:30

तालुक्यातील दुर्गाबाई डोह कुंभली येथे मागील २१ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या ...

The water from the following calamity project will be available from January | जानेवारी महिन्यापासून मिळणार निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी

जानेवारी महिन्यापासून मिळणार निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी

बाळा काशीवार यांची माहिती : शिवणीबांध, कुंभली, खंडाळा येथे पहिल्यांदा सोडणार पाणी
संजय साठवणे  साकोली
तालुक्यातील दुर्गाबाई डोह कुंभली येथे मागील २१ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या जानेवारी २०१७ पासून या प्रकल्पातील पाणी शेतीला सिंचनासाठी मिळणार आहे. अशी माहिती आ.बाळा काशीवार यांनी दिली. यावेळी या विभागाचे उपविभागीय अभियंता डी.ई. चोपडे उपस्थित होते. प्रकल्पाच्या सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर शिवणीबांध, कुंभली व सावरबंध या गावातील तीन हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे.
१९९५ साली साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम सुरु झाले. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे लावण्यात आले असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पापासून २३ गावातील ५ हजार ३९७ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत चुलबंद नदीचे पाणी अडवून संबंधित पाणी कालव्याद्वारे कुंभली, सावरबंध, खंडाळा, शिवणीबांध, पाथरी, साकोली व बोदरा या गावातील तलावात पाणी सोडण्यात येणार आहे व या तलावातील पाणी उन्हाळी व पावसाळी धानलागवडीसाठी याचा उपयोग होणार आहे.
सदर प्रकल्पाला तब्बल २१ वर्षाचा कालावधी लागला असून या प्रकल्पाचे पाणी शेतीकरिता लवकरात लवकर मिळावे यासाठी आ.बाळा काशीवार यांनी प्रयत्न केले. काल कुंभली येथे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्याची पाहणी केली व पंप हाऊसचे काम युद्धस्तरावर करून येत्या उन्हाळी पिकाकरिता पाणी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनीही येत्या जानेवारी पर्यंत पंपहाऊसचे काम पूर्ण करून पाणी देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: The water from the following calamity project will be available from January