जलवाहिनी फुटली, २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी

By Admin | Updated: May 25, 2017 00:14 IST2017-05-25T00:14:33+5:302017-05-25T00:14:33+5:30

नाला खोलीकरणाचे खोदकाम करताना जेसीबीने तुमसर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटली.

Water cut, 20 lakh liters of water wasted | जलवाहिनी फुटली, २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी

जलवाहिनी फुटली, २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी

तुमसरात कृत्रिम पाणीटंचाई : जिल्हा परिषद नाला खोलीकरण करताना घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नाला खोलीकरणाचे खोदकाम करताना जेसीबीने तुमसर नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटली. यात जवळपास २० लक्ष लिटर पाण्याची नासाडी झाली. पाण्यामुळे नाला दुथडी भरून वाहू लागला. याचा फटका तुमसरकरांना बसला. आज पाणीपुरवठा झालाच नाही.
दुसरीकडे नगर पालिका प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून लिकेज दुरुस्त केले. जिल्हा परिषदेमार्फत देव्हाडी (माडगी) शिवारात नाला खोदकाम सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या निष्काळजीपणामुळे येथे पाणी व्यर्थ गेले.
शहराला माडगी येथील वैनगंगेतून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या, देव्हाडी (माडगी) शिवारातून जातात. जिल्हा परिषद देव्हाडी शिवारातील नाला खोदकाम, खोलीकरण तथा सरळीकरणाचे कामे करीत आहेत. जेसीबीने सदर कामे करताना तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नाल्याजवळून जाते. खोदकाम करताना जेसीबीने जलवाहिनी फुटली. मोठा लिकेज जलवाहिनीत निर्माण झाले. पाहता पाहता नाला तुडूंब वाहू लागला. एवढे पाणी कुठून आले याविषयी येणाऱ्या -जाणाऱ्यांचे लक्ष गेले. पालिका प्रशासनाला याची माहिती तोपर्यंत नव्हती. रात्रीला तुमसर शहरातील जलकुंभात पाणी का आले नाही याची चौकशी सुरु झाली. नंतर देव्हाडी शिवारात मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याचा प्रकार उघडकीस आला. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर, इतर नगरसेवक, पाणीपुरवठा अभियंता गणवीर तथा तांत्रिक कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून २४ तासात लिकेज दुरुस्त केले. संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती नगराध्यक्षांनी संबंधित अभियंत्यांना दिली. दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती येथे निर्माण झाली होती.

पाणी टंचाईवर मात करण्याकरिता नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची तथा निष्काळजीपणाची माहिती जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्वरीत दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.
-मेहताबसिंग ठाकुर,
पाणीपुरवठा सभापती, तुमसर

Web Title: Water cut, 20 lakh liters of water wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.