पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: September 2, 2016 00:35 IST2016-09-02T00:35:15+5:302016-09-02T00:35:15+5:30
भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना

पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : शहर काँग्रेस कमिटी यांचा इशारा
भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना भंडारा शहरातील दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
भंडारा शहरामध्ये नगरपालिका हद्दीत सन १९०० पासून पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे व पाणीपुरवठा योजनेचे मुख्य स्त्रोत वैनगंगा नदी आहे. त्यावेळेसची मुख्य वितरण नलिका प्रणाली मध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आमुलाग्रह बदल करण्यात आलेले आहे. सन १९९२ मध्ये जलशुद्धीकरणाची योजना लागू करण्यात आली. शहरामध्ये वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या मागणीनुसार विविध वॉर्डात वितरण नलिका घालण्यात आलेली आहे. घालण्यात आलेली वितरण नलिका ही समस्तरीय नसल्याने काही भागात अत्यल्प पाणीपुरवठा होतो व काही भागात होतच नाही. तसेच संपूर्ण नगरपालिका हद्दीत नव्याने रस्ते व गटारी तसेच नवीन वसाहती तयार झाल्यामुळे अस्तित्वातील वितरण नलिका ही खोलवर गेली. त्याचप्रमाणे काही भागात ह्या गटारी खाली असून काही भागात गटारी इमारतीच्या खाली गेलेल्या आहेत.
वैनगंगा नदीवर इंदिरासागर गोसे प्रकल्प बांधण्यात आलेले असून जोपर्यंत या बांधमध्ये पाणी साठवणीचे काम सुरू झालेले नव्हते. तेव्हापर्यंत शहरातील नागरिकांना योग्य दर्जाचे पाणी मिळत होते. परंतु सन २०१२-१३ पासून या बांधमध्ये पाणी साठविण्याचे काम सुरू झाल्यानंतर नागपूर येथून वाहणारी नागनदीचे पाणी सुद्धा या वैनगंगा नदीमध्ये प्रवाहीत करण्यात येत आहेत. ते दूषित पाणी शहरातील नागरिकांना पिण्यास मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)